Advertisement

Responsive Advertisement

धर्माबाद शहरातील प्रमुख रस्त्यावर अद्यापही पाणी गळती चालूच, हजारो लिटर पाण्याचा अपव्ययन.पा. प्रशासनाचे पुन्हा दुर्लक्ष


धर्माबाद- नगरपालिका अंतर्गत धर्माबाद शहरातील प्रमुख रस्त्यावर ठिकठिकाणी पाईप लाईन फुटल्यामुळे पाणी गळती चालूच असून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे असून नगरपालिका प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
गेलाच महिन्यात याबाबत ठळक वृत्त प्रकाशित झाले होते. धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत शहरातील प्रमुख रस्त्यांसह रत्नाळी व बाळापूर या गावातही ठिकठिकाणी पाईप फुटून पाणी गळती होत आहे. निलावार ज्वेलर्सच्या बाजूलाच अजूनही पाणी गळती चालूच आहे. तद्वतच देवी गल्लीतील प्रमुख रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन फुटून फवारे उडत असल्याचे विलोभनीय चित्र जरी दिसत असेल तरी ते नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणाचा उत्तम नमुना आहे. आणि अशा ठिकाणी पाईप गळतीमधून सांडपाणी त्याच्यामध्ये मिसळून धर्माबादकरांच्या आरोग्यास धोका उत्पन्न झाला आहे.
 उपरोक्त पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या फुटलेल्या पाईप लाईन दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या