Advertisement

Responsive Advertisement

शिवसेने कडुन डोंगरगाव कार्नर तामसा रोडवर रास्तारोको आंदोलन

  हदगाव (ता.प्र.विकास राठोड ).                               हदगाव येथील  श्रीदेऊखळाई आश्रम,व कदम नगर डोंगरगाव रोडवरील नाला काही तेथील लोकांनी माती टाकून बंद केल्यामुळे नैसर्गिक स्त्रोतास पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पाणी रोडवरून 2 ते 3 फूट पाणी वाहत असल्याने डोंगरगाव ,पिंगळी, गारगव्हान, केदारनाथ, लिमटोक येथिल लोकांना ,व शाळेतील, कॉलेज मधील विद्यार्थ्यांना व  रुग्ण,वृद्ध व्यक्तींना व कदम नगर मधील लोकांना या पाण्यातून आपला जीव मुठीत धरून जावं लागत,या समबंधी अनेक वेळा हदगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी  यांना या संदर्भात निवेदन दिले परंतु याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून चालढकल पना करून वेळ मारून नेत आहेत,परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे विध्यार्थी, वाहनधारक प्रवाशी याना जीव धोक्यात घालून जावं लागतं या पाण्यामुळे रोड ला खड्डे पडल्यामुळे अनेक विद्यार्थी, मोटरसायकल, व सायकलवर जाणारे व वृद्ध वयोगटातील महिला पुरुष या पाण्याच्या प्रवाहामुळे पडलेल्या खड्ड्यात अनेकजण पडलेत व पुन्हा पडू शकतात यामुळे डॉ भगवान निळे पंचायत समिती सदस्य यांच्या नैतृत्वाखाली दि 29 जुलै 2022 रोजी   डोंगरगाव कॉर्नर तामसा रोडवर रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांनी मात्र येण्याचे टाळून त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून नपाचे अभियंता  श्री शेख  व कदम नावाचे कर्मचाऱ्यांनी या रास्तारोको आंदोलन कार्यकर्त्याना भेट दिली व संबंधित नाल्याच्या नकाशा सह मोजणीचे पत्र भूमिअभिलेख कार्यालयात दिल्याची पावती दाखवली व  नैसर्गिग पाणी कमी झाल्याने  नाली काढून पाणी रोडवर येणार नाही असं फोनवरून मुख्यअधिकारी यांनी रास्तारोको आंदोलन कर्त्याना सांगितल्याने  
 रस्ता रोकोआंदोल कर्त्यानी मुख्याधिकारी याना जर  15 ऑगस्टच्या अगोदर डोंगरगाव रोडवरील नैसर्गिक पाणी येत असलेली नाली काढली गेली नाहीत तर पुन्हा आत्मदहन करण्याचा इशारा  डोंगरगाव येथील रास्तारोको करणाऱ्या गावकऱ्यांनी  दिला 
दि 27 जुलै2022 रोजी नपाचे मुख्याधिकारी ,हदगाव तहसीलदार, व पोलीस स्टेशन हदगाव याना  दि 29 जुलै 2022  डोंगरगाव कॉर्नर तामसा रोड हदगाव या ठिकाणी   रास्ता रोखो करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते  नगर परिषद हदगाव चे मुख्यअधिकारी यांनी येण्याचे का टाळले हे मात्र कळले नाही , याकडे जर कान डोळा केला तर आम्हाला नगर परिषेदेच्या ,सर्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध       आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असे रास्तारोको करणाऱ्या गावकऱ्यांनी सांगितले असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर राहील असे सांगितले आहे,
रास्तारोको केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु संबंधित अधिकारी यांनी आश्वासन दिल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या