Advertisement

Responsive Advertisement

सिल्लोड मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फर्दापुरातील शिवस्मारक व भीमपार्कचे उदघाटन...


सोयगाव/विजय पगारे
------+
सिल्लोडच्या जाहीर सभेतून थेट फर्दापुरातील शिवस्मारक व भीमपार्कच्या जागांचे भूमिपूजन रविवारी ता.३१ एका क्लिक वरून ऑनलाइन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी सिल्लोड ला भव्य नागरी सत्कार व सिल्लोड शहरातील विबिध विकासकामांचे उदघाटन कार्यकम आयोजित करण्यात आला होता यावेळी सिल्लोडच्या थेट जाहीर सभेतून एका क्लिकवर बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फर्दापुरातील भव्य शिवस्मारक व भीमपार्क च्या जागांचे भूमिपूजन करण्यात आले लाखोंच्या साक्षीने झालेल्या या उदघाटन सोहळा पाहण्यासाठी सिल्लोड,सोयगाव आणि भोकरदन तालुक्यातील नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे,आमदार अब्दूल सत्तार,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री उदय सामंत,सुरेश जाधव,सुरेश नवले, सयाजीराव गायकवाड,संजय राठोड,आदींसह जिल्ह्यातील नागराध्य8,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदींची उपस्थिती होती
------पहिल्या टप्प्यात शिवस्मारकाच्या कामासाठी ३० कोटी रु चा निधी वितरित करण्यात आला तर भीमपार्क साठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रु चा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
----शिवस्मारक साठी फर्दापुर शिवारातील गट क्र-६७ मधील दहा एकर व मौजे ठाणा शिवारातील गट क्र-२९ मधील दहा एकर जागा भीमपार्क साठी शनिवारी ग्रामविकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना हस्तांतरित करण्यात आल्याची कार्यवाही तहसीलदार रमेश जसवन्त यांनी केली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या