Advertisement

Responsive Advertisement

खरवली येथे कृषि दिनानिमित्त कृषी दिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

        बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली  संलग्न श्री. भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषि महाविद्यालय आचळोली , ता.महाड, जि.रायगड यांद्वारे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि  औद्योगिक  संलग्नता २०२२-२३ या अभ्यासक्रमांतर्गत महाविद्यालयाचे कृषिदूत, ग्रामपंचायत खरवली आणि नूतन माध्यमिक विद्यालय खरवली यांच्या संयुक्त विद्यमाने खरवली गावात मोठ्या उत्साहात 'कृषिदिन' पार पाडण्यात आला.
        कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. कृषिदूतांकडून या दिनाचे औचित्य साधून वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांचे जतन व्हावे यासाठी कृषि दिंडीचे व वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन केले गेले. खरवली गावचे सरपंच मा. श्री. मनीषा महादेव खडतर, नूतन माध्यमिक विद्यालय खरवलीचे मुख्यध्यापक मा.श्री गुळवणी सर, कृषि सहाय्यक मा.श्री अमोल गावडे,  ग्रामसेवक श्री. अप्पासाहेब सावंत,  खरवली गावाचे उपसरपंच मा. श्री स्वप्निल संकपाळ, तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा पार पाडण्यात आला.या कार्यक्रमासाठी नूतन माध्यमिक विद्यलाय खरवली येथील विद्यार्थ्यांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.
       तसेच, कृषि महाविद्यालय अचळोली चे प्राचार्य. डॉ.व्ही.जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वय प्राध्यापिका व्ही.आर. पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.सी. होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि
महाविद्यालयातील कृषि दूत
कु.पार्थ जाधव, कु. आकाश भोसले, कु. दीप घोरपडे, कु. आनंदराज हळणवर, कु.तुकाराम घोळवे, कु.विशाल दुधाळ आणि कु. शिवराज भोसले या कृषिदूतांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या