Advertisement

Responsive Advertisement

विस्डम शाळेत जागतिक मैत्री दिन उत्साहात साजरा...


धर्माबाद- येथील विस्डम म्हणजेच विद्यारण्या शाळेमध्ये जागतिक मैत्री दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या सत्रात शाळेत येताच विद्यार्थ्यांनी एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत मैत्री घट्ट करण्याचा प्रयत्न करीत एकमेकांच्या हाताला रंगीत धागे बांधले.  जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सहसा 28 जुलै रोजी हा मैत्री दिवस साजरा केला जातो. या मैत्री दिनाचे महत्त्व म्हणजेच जागतिक शांतता, सौहार्द वाढविणे असून मैत्रीची मूलभूत कल्पना आणि महत्त्व आता जगभरातील सर्वच लोकांनी स्वीकारले आहे. या मैत्रीदिनाबद्दल चिमुरड्या विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह संचारलेला असतो. विद्यार्थ्यांनी शाळेत येतात कृतिशील असलेले प्राचार्य औसाजी जाधव यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वादही घेतले व एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत आपली बांलमैत्री भविष्यात दृढ करण्याचा जणू काही संकल्पच केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या