Advertisement

Responsive Advertisement

ऊर्जा महोत्सव उत्साहात


औरंगाबाद दि.27 

 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य - पॉवर@२०४७' उपक्रम २७ जुलै रोजी (बुधवारी) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामुकाका शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष रामबाबा शेळके उपस्थित होते. 

ऊर्जा ही समाजाचा अविभाज्य घटक असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे आवाहन आमदार बागडे यांनी केले. तर भविष्याचा विचार करून अपारंपरिक ऊर्जेवर भर देण्याची गरज डॉ.गोंदावले यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ऊर्जा विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामांची माहिती पोस्टर्स व चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. श्रावण कोळनूरकर, शिवाजी नरवडे, रमेश शिंदे, सुनील बनसोड, अभय एरंडे, अश्विनी पोतलवाड, प्रज्ञा दिवेकर, मधुकर कोळनूरकर यांनी वीजचोरीचे धोके, ऊर्जा बचत, महावितरणच्या ऑनलाईन सेवा व वीजबिल भरण्याचे महत्त्व या विषयांवर पथनाट्य सादर केले. केतकी पखाले यांच्या शिष्यांनी भारतीय नृत्य सादर केले.

कार्यक्रमास लाडगावचे सरपंच कल्याण गाडेकर, पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे मुख्य महाव्यवस्थापक के.बी. सुब्रमण्यम, महापारेषणचे अधीक्षक अभियंता कांबळे, विद्युत निरीक्षक मदाने यांच्यासह महावितरण, महापारेषण, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली तर सूत्रसंचालन रुपाली पहुरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने, जैस्वाल, प्रभारी उपकार्यकारी अभियंता मनीष मगर, सहायक अभियंता योगेश चेंडके, बाळासाहेब बर्वे, मनीष डिघुळे यांच्यासह महावितरणच्या कर्मचारी व जनमित्रांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला  परिसरातील नागरिक, वीजग्राहक मोठ्या संख्येत उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या