Advertisement

Responsive Advertisement

शेतकरी व्यापाऱ्यांची चोरट्यांनी शेटर तोडुन आठ लाखांचा माल केला लंपास, पळसा येथील घटना


 हदगाव - (.विकास राठोड) हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील शेतकरी राजेश श्रीकृष्ण मिश्रा  यांच्या कुटुंबात  पळसा सह किन्हाळा  येथील अलग अलग शेत शिवारात पंचवीस हेक्टर च्या आसपास कोरडवाहू   ओलीतीखाली जमीन आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून परीसरातील शेतीचा शेत माल घेण्याचा व्यवसाय करत असताना  दररोजच्या  मालाची वाहनाने  चढ उतार करण्यासाठी रस्ता सह नेहमी च्या वर्दळीने सुरक्षित ठिकाण म्हणून रस्ता नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर  पळसा येथील गट क्रमांक २८४-२८५ मध्ये शेटर मध्ये परीसरात नेहमी प्रमाणे एक दोन दिवसात खरेदी केलेला माल  विक्री करण्यासाठी सततच्या पावसामुळे बाजारापेठेतील अडचणींमुळे ठेवत उघडल्यानंतर विक्री करण्यासाठी ठेवला असता शुक्रवारी पंधरा रोजी मध्यरात्री चोरट्यांनी शेटर तोडुन आत मधील हळद १६० कट्टे तुर ३५ कट्टे सोयाबीन ४५ कट्टे असे अंदाजे आठ लाख रुपये किंमतीचा माल चोरीला गेल्याची घटना घडली.
घटनेची माहिती सकाळी संबंधित व्यापा-यांनी मनाठा पोलिस स्टेशनला दिली असल्याने पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक टि.वाय.चिट्टेवार यांनी पंचनामा करून श्वान पथकासह  फिन्गर पथकांचे अधिकारी पाचारण केले होते.यावेळी बिट जमादार मधुकर पवार जमादार गिरी कानिस्टेबल आनंद वाघमारे उपस्थित होते.राष्टीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना व हदगाव मनाठा पोलीस स्टेशनच्या सिमेलगत रोडवर घडलेल्या चोरीच्या घटनेने चोरांचे मनोबल वाढले आहे.तर या चोरीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी सर्व सामान्य माणसांकडून व्यक्त केली जात आहे.  पुढील तपास मनाठा पोलीस स्टेशन करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या