Advertisement

Responsive Advertisement

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्तकरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री


 

            मुंबईदि. 16 : -  मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

            बैठकीस राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तवअतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहनगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीनगरविकास  विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठीएमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासनएमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवारठाणे महापालिका आयुक्त     डॉ. विपीन शर्माठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गननवी मुंबईमिरा भाईंदरठाणे जिल्ह्यातील वरीष्ठ पोलीस अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.

            रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोडींच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणालेएमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित कराव्यात. या टीम चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करतील. खड्डे दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा. वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातीलयाची काळजी घ्या. वाहतूकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा. रस्ता कोणाचा आहे हे लोकांना माहित नसते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी प्रयत्न करा. खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेत राहा. पोलिसांनीही या यंत्रणाच्या संपर्कात राहून रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. महामार्गांवरील वाहतुकीचे नियमन करा. विशेषतः जेएनपीटी आणि अहमदाबाकडून येणाऱ्या वाहतूकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डे मुक्त राहतीलयाची काळजी घ्यावीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री म्हणालेएकंदरच एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प – रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्यात यावा. त्यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करण्यात यावे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. बायपासफ्लायओव्हरअंडरपाससर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारचे नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा. यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारीसंबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे. एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासहठाणेनवी मुंबई तसेच शीळ फाटाकल्याण-डोंबिवलीमिरा-भाईंदरउल्हासनगरभिवंडी अशाच सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेतअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

०००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या