Advertisement

Responsive Advertisement

दि पिपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातुन पो. ह. राजेंद्र वाघमारे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य रुपाने मदतीचा हात...


        बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील हातोंड हे अतिशय दुर्गम असे खेडे गाव आहे. डोंगर माथ्यावरील या गावाला लागूनच म्हणजे किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आदीवासी वस्त्या आहेत.  
रायगड जिल्हा परिषद शाळा हातोंड या ठिकाणी याच आदिवासी वस्त्यातिल मुले शिक्षण घेत आहेत. पहिले ते सातवी पर्यंत असलेल्या शाळेत या मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  शिक्षणाचे महत्व या समाजात तितकेसे न रुजल्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहत असतात.  खर्च आदी समस्यांचा बोजा या मुलांवर अर्थात त्यांच्या पालकांवर पडू नये म्हणून या गावचे सुपुत्र राजेंद्र रघुनाथ वाघमारे ( पोलीस हवालदार बिनतारी  संदेश विभाग मुंबई.) यांनी द्या एक मदतीचा हात या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून सातत्याने मुलांना आणि शाळेला जी मदत करता येईल ती करीत आहेत.  
      दि पिपल्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आणि आदरणीय - अरुण डुंबरे साहेब पोलीस निरीक्षक बि. सं वि. मुंबई , आदरणीय मिलिंद कुलकर्णी साहेब पोलीस उप निरीक्षक मुंबई , आदरणीय  अनुष्काताई ढाले महिला पोलीस हवालदार मुंबई.  तसेच खोपोली येथील व्ही डी एम स्कूल चे चेअरमन आदरणीय उल्हासराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने  सहकार्यातून व यश क्लास खोपोली चे डायरेक्टर ट्रेनर आदरणीय  प्रवीणकुमार सर आणि कांचन मॅडम , अर्चना राजेंद्र वाघमारे , दिक्षा रा. वाघमारे यांच्या हस्ते  शाळेतील सर्व मुलांना रेनकोट छत्री आणि शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. 
       गेल्या सहा वर्षांपासून समाजातील अनेक दानशूर व्यक्ती द्या एक मदतीचा हात या उपक्रमाला सातत्याने मदत करीत असतात म्हणूनच सातत्य राखणे शक्य झाले आहे. मी तर या गावाचा पुत्र आहे त्यामुळे माझे कर्तव्यच आहे.  परंतु असे आदर्शवत व्यक्ती आहेत की त्यांना हे गाव,ही शाळा असे काहीच माहीत नसूनही या शाळेतील मुलांना मदतीचा हात देत आहेत.  अशा सर्व आदर्शाना त्रिवार वंदन आहे. तुमचे मोलाचे सहकार्य नसेल तर हा राजेंद्र वाघमारे या सर्व मुलांचे पालकत्व कसे स्वीकारू शकतो.  मी एक फक्त निमित्त आहे. या शाळेतील शिक्षक अजित पाटील सर (मुख्याध्यापक ) योगेश भांड सर,अंकुश काकरा सर आणि सहकार्य करणारे समाजातील आदर्शवत दानशूर व्यक्ती यांची साथ आणि आशीर्वाद कायम या मुलांच्या सोबत रहावेत  ही प्रार्थना आहे. 
   प्रवीणकुमार सरांनी मुलांना मेमरी पावर चे धडे देवून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. आम्ही देखिल या शाळेला आणि मुलांना पालकांना जी शक्य होईल ती मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे अभिवचन दिले. 
      इयता सातवी नंतर या मुलांना पुढील शिक्षणासाठी किमान सहा किलोमीटर अंतरावरील शाळेत  पायी चालत जावे लागते. करीता या शाळेला एक स्कूल व्हॅन ची गरज आहे.  समाजातील दानशूर व्यक्ती , संस्था यांनी पुढे येवून मदतीचा हात द्यावा असे आवाहन राजेंद्र वाघमारे यांनी केले.  शाळेचे मुख्याध्यापक अजित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. 
यावेळी , प्रवीणकुमार सर ,कांचन मॅडम , अर्चना वाघमारे ,दिक्षा वाघमारे , रोहिणी भांडीलकर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या