Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण....


सोयगाव -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोयगाव तालुक्यातील माळेगाव ता.सोयगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपनाचा संकल्प करण्यात आला.
          पर्यावरणाचे संतुलन  राहण्यासाठी, शाळा सुंदर, सुशोभीकरण होण्यासाठी मुलांना आवड निर्माण व्हावी  या उद्देशाने अनेक फुलझाडे शोभिकरण  वृक्षरोपण करण्यात आले शिक्षक वृंद, विद्यार्थी , निसर्ग मित्र आदींनी  वृक्षारोपण केले. वृक्षारोपण केलेल्या झाडांना संगोपनासाठी ट्रीगार्ड लावून संगोपनाची जबाबदारी सर्व व्यवस्थापन समितीने घेतली आहे. 
यावेळी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक प्रताप साळुंखे ,शिक्षक नरेंद्र बारी ग्राम पंचायत सरपंच दादाभाऊ जाधव, ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे, पंचायत समिती सदस्य - शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष - रविंद्र पाटील, अनिल जाधव, पोलिस पाटील मंगलदास अहिरे, माजी सरपंच शिवराम जाधव,विक्रम आप्पा जाधव व ग्राम पंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य आदी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या