Advertisement

Responsive Advertisement

तलवाडा ग्रामपंचायती कडुन माय-बापांसाठी थोडेसे काही’उपक्रम ,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा
वैजापुर -तालुक्यातील  तलवाडा गवच्यालोकसंख्येच्या 10 टक्याच्या आसपास जेष्ठ नागरीक आहे.या नागरिकांसाठी तलवाडा  ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून
वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे माय बापासाठी थोडेसे या निमित्ताने जेष्ठ नागरीकांना छञी वाटप कार्यक्रमात आयोजन करण्यात लाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद निलेश गटने यांच्याआदेशावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे व गटविकास अधिकारी केटी जाधव यांच्या मार्गदर्शनातून तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने  येथे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथील नागवाडी जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र मगर रईस शेख सरपंच पुनम मगर,सुवर्णा मगर,रंजना मगर सुनिता मगर सिमा पवार,जापान सोनवणे दादाभाऊ मगर,ज्ञानेश्वर मगर,वसंत मगर शांताराम मगर आसिप शेख,ग्रामसेवक आर आर पवार,तलाठी आर के गायकवाड मंडळ आधिकारी जयसिंगपुरे मॅडम जालीदर वाघ मेजर पढाण सतोष सुर्यवंशी,आप्पासाहेब जाधव,राधाकृष्ण सोनवणे,चेअरमन राजेंद्र मगर दत्तु मगर,काकासाहेब पवार राजेद्र गवांदे,नारायण तुपे,रामदास मगर,शिवाजी किटे  काकासाहेब मगर राजेद्र मगर प्रकाश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळेस बोलतांना तहसीलदार राहुल गायकवाड म्हणाले ज्येष्ठांना अनेकदा घरातील अडचण म्हणूनही पाहिले जाते. पाल्यांकडून त्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीदेखील समाजात दिसत आहेत. संपत्ती, जमिनीच्या वाटण्या केल्यानंतर ज्येष्ठांचे प्रचंड हाल होतात अनेक नागरिक प्रशासनापर्यंत येत आहेत. कोरोना काळात अशा तक्रारींचा आकडा मोठा होता. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेंकर यांनी हा उपक्रम हाती घेत नियोजन केले असून त्याला मुहूर्त रूप येत आहे.
ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी ग्रामीण भागात कुठेही जागा मिळत नाही.अनेक गावात विरंगुळ्याचे त्यांना हक्काचे ठिकाण नाही.
परंतु तलवाडा हे त्याला अपवाद आहे या गावात सामाजिक सलोखा आसुन थोरामोठ्यांचा आदर सेवाभाव संस्कारक्षम सुजाण नागरिक यातायात असल्यामुळेच हे शक्य आहे असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले तर सरपंच पुनम मगर यांनी सांगितले 
जेष्ठ नागरीकांना एकत्र येऊन एकमेकांचे सुखदु:ख जाणून घेता  घ्यावे. यासाठी तलवाडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुस्तकांची व्यवस्था. बसण्यासाठी खुर्च्या, सतरंजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा पध्दतीने ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था करण्याचा तलवाडा ग्रामपंचायतीचा मानस आहे आसे सरपंच पुनम मगर यांनी सांगितले
यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येत हजर होते.
●●●प्रतिक्रया●●●

""वृध्दापकाळ तणावमुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न ""

ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखमय, आनंदी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त जावे या उद्देशाने “थोडेसे माय-बापासाठी” हा उपक्रमातंर्गत वृद्धापकाळ सुसह्य व तणावमुक्त करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या सामाजिक भावनेतुन हा छोटासा प्रयत्न 
शांताराम मगर 
ग्रामपंचायत सदस्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या