Advertisement

Responsive Advertisement

फर्दापुर गावात आढळुन आलेले अट्टल चोरांना फर्दापुर पोलीसांकडून अटक...

सोयगाव /विजय पगारे
--------------------- 
पोलीस ठाणे फर्दापुर ता.सोयगाव येथील पोलिस नाईक लोखंडे,  पंकज व्यवहारे, पोलीस अंमलदार  योगेश कोळी तिघ मौजे फर्दापुर गावात पेट्रोलींग करत असतांना अजिंठा लॉजच्या पाठीमागील गल्लीत संशयास्पद इसम फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यावरुन पोलीस आणि पंचासह घटनास्थळी बातमीच्या ठिकाणी गेले तर सदर ठिकाणी दोन इसम मोटार सायकलसह संशयास्पदरित्या काहीतरी गंभीर गुन्हा घडुन आणन्याच्या उदेशाने मिळुन आले. त्यांना शनिवारी (ता.३०) ताब्यात घेवुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीचे असंबद्ध उत्तरे देत असल्याने त्यांना पोलीस ठाणे फर्दापूर येथे विचारपुस केली तेव्हा सदर आरोपीतांनी मौजे मोढा ता. सिल्लोड येथुन एक मोटार सायकल चोरी आलेली होती , काहीतरी मालाविरुद्धचा गंभीर गुन्हा घडवुन आणन्याचे तयारीत होते,गुन्हाच्या उद्देशाने मिळुन आले म्हणुन पोलीस अंमलदार व्यवहारे यांच्या तक्रारीवरुन फर्दापूर पोलीससात  गुरनं ९६/२०२२ कलम माधवी. चे १२२ (अ), १२४ म. पो. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी १) गुरलाल हरसिंग भिलाला वय २४ वर्ष रा. नहालबंद पोस्ट
धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. २) आद्या दशरथ भिलाला वय ३५ वर्ष रा. नहालबंद
पोस्ट धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. यांना सदर गुन्ह्यात अटक करुन यांच्या कडुन
त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस
ठाणे सिल्लोड ग्रामिण येथे नमुद आरोपीतांन विरुद्ध गुरनं २२० / २०२२ कलम ३७९ भादवी प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रमाणेच पोस्टे सिल्लोड ग्रामिण येथे सदर आरोठपीतांना
ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

नमुद कारवाई  मणिष कलवानिया पोलीस अधीक्षक,  पवन बनसोड अप्पर
पोलीस अधीक्षक, विजयकुमार मराठे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड, यांचे
मार्गदर्शनाखाली सपोनि डी. बी. वाघमोडे, पोउपनि आर. जी. कासले, पोना निलेश
लोखंडे, पोलीस अंमलदार   योगेश कोळी,  कज व्यवहारे, सतिष हिवाळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या