Advertisement

Responsive Advertisement

वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार राहुल गायकवाड याचे आवाहन

वैजापूर-
वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ 
जनतेने मोठ्या संख्येने वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले. वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनावरही भर दिल्या जावा,असेही ते म्हणाले.
      वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे वृक्षलागवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 
माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद निलेश गटने यांच्याआदेशावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनातून तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने  तहसीलदार राहुल गायकवाड व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथील नागवाडी परिसरात  वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र मगर रईस शेख सरपंच पुनम मगर ग्रामपंचायतसदस्य,सुवर्णा मगर,रंजना मगर सुनिता मगर सिमा पवार,जापान सोनवणे शांताराम मगर आसिप शेख,ग्रामसेवक आर आर पवार,तलाठी आर के गायकवाड मंडळ आधिकारी जयसिंगपुरे मॅडम जालीदर वाघ  मेजर पढाण दादाभाऊ मगर ज्ञानेश्वर मगर वसंत मगर चेअरमन राजेंद्र मगर दत्तु मगर,काकासाहेब पवार राजेद्र गवांदे,नारायण तुपे,रामदास मगर,शिवाजी किटे  काकासाहेब मगर राजेद्र मगर प्रकाश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना तहसीलदार राहुल गायकवाड म्हणाले.तलवाडा येथील युवकांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर लावण्याच्या परंपरेला फाटा देत पर्यावरणाचे संवर्धन व वृक्ष संगोपणाच्या चळवळीचे देखिल कौतुक केले.व
तलवाडा येथील घनदाट वुक्ष लागलड हे इतरांसाठी मॉडेल झाले पाहिजेत.अशी अपेक्षा व्यक्त केली.
तापमान वाढ, पाणीटंचाई, अशा संकटांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड वृक्ष लागवडीचा उपक्रम शासकीय न रहाता जनतेचा झाला पाहिजे,असे सांगुन गायकवाड म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी वन संवर्धन गरजेचे असून त्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वनआंदोलनाचे स्वरुप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे.
दिर्घायुष्याकरीता नैसर्गिक आरोग्यवर्धक गुणधर्म अंतर्भुत असलेलेे वृक्ष मानवाला प्राणवायु, फळं, फुलं, सावलीच देत नाहीत तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात. ही जाणीव अंगी बाळगून त्याने पर्यावरणास घातक ठरणार्‍या घटकांचे पतन करुन वृक्षांचे रक्षण केले पाहिजेत.वृक्ष लागवड करण्याकरीता सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.पर्जन्यमानासाठी व पारिस्थितीकी संतुलनासाठी दृष्टिने  निश्‍चितच उपयुक्त असल्यामुळे ग्रामीण भागाच्या सौदर्यात सुध्दा भर पडेल. नागरीकांनी वृक्षांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून संगोपन केल्यास शुध्द प्राणवायु मिळेल तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
 वृक्षारोपण मोहिमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगतांना गायकवाड म्हणाले की, सामाजिक उद्देश समोर ठेवून जैवविविधता राखणाऱ्या आणि कमी क्षेत्रात अनेक प्रकारची घनदाट झाडी  मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्षलावगडीच्या मोहिमेत सर्वांनी हिरीरीने सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले.
.यावेळी गावातील शेतकरी वुक्ष प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या