Advertisement

Responsive Advertisement

कै. बाबुरावजी काळे स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी केली शिक्षकासमवेत गुरुपौर्णिमा साजरी...सोयगाव / प्रतिनिधी
 
सोयगाव येथिल कै.बाबुरावजी काळे स्याकुलमध्ये (ता.१३) बुधवारी गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रविंद्र जाधव हे होते या कार्यक्रमात इ.८ वी ते १० चे विद्यार्थींनी प्राची पाटील, धनश्री वाघ, गुंजन पाटील, भावेश गवळे, दर्शन पाटील, अथर्व मानकर, सायली पाटील, राजश्री मिसाळ, आदिती पाटील, किर्ती पाटील , सोजल पवार आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली व शाळेतील शिक्षकांना पुप्षगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे यांनी विद्यार्थ्यांना वीर एकलव्य यांच्या बद्दल ची गोष्ट सांगुन शिष्याच्या मनात गुरुचे काय स्थान असते या बद्दल माहिती सांगितली व गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता पाटील या विद्यार्थ्यीनीने केले तर आभार प्राध्यापक रविंद्र जाधव यांनी केले, मित्र काय असतो यावर सुंदर कविता सादर करुन उपस्थितांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमासाठी  शाळेचे शिक्षक  ज्ञानेश्वर एलीस, योगेश काळे, शितल काटोले, मनिषा पाटील, शितल पगार , आशा पंडित,विद्या पाटील, प्रणय  कुलकर्णी पुजा इंगळे, नलिनी पाटील, नम्रता पाटील, प्रेरणा मोरे, मुश्ताक शहा, संजय डापके ,ज्ञानेश्वर पंडित आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या