Advertisement

Responsive Advertisement

सिल्लोडमध्ये विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


    
औरंगाबाद,  दिनांक 31 :सिल्लोडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  सिल्लोड शहराच्या दौर्‍यावर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, स्व.बाळासाहेब ठाकरे चौक, नगर परिषद प्रशासकीय इमारत, नगर परिषद प्रशाला बांधकाम व भराडी येथील नॅशनल सूतगिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार आदी यावेळी उपस्थित होते.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या