Advertisement

Responsive Advertisement

जिंतूरात नाट्यगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर ,आ.मेघना बोर्डीकरांच्या पाठपुराव्याला यशज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
              जिंतूर शहर व परिसरातील कलावंतांना हक्काचे रंगमंच प्राप्त व्हावे तसेच परिसरात सांस्कृतिक विकास घडवून आणण्याकरिता आमदार मेघना बोर्डीकर यांनी शहरात अद्यावत व सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासाठी शासन दरबारी नियमित पाठपुरावा केल्याने राज्याचे नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आ मेघना  बोर्डीकरांच्या मागणीची दखल घेऊन  नाट्यगृह उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवून तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. 
            शहरासह तालुक्यातील कलावंत आणि सांस्कृतिक चळवळीतील नागरिकांमधून बऱ्याच वर्षापासून शहरात अद्यावत व सुसज्ज नाट्यग्रृह उभारणीची मागणी लक्षात घेता आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा करून शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एका नाट्यगृह बांधकामाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि याची तात्काळ दखल घेत  महाराष्ट्र शासनाने नाट्यगृह उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवून  तब्बल पाच कोटी रुपयाचा निधी नगर विकास विभागा मार्फत तात्काळ मंजूर करून सदर मंजुर करण्यात आलेला निधी जिल्हाधिकारी, कार्यालय परभणी यांना वर्ग करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी या यंत्राने मार्फत करण्यात येणार असून या कामाचे सविस्तर अंदाजपत्रक तात्काळ तयार होऊन लगेचच कामास सुरुवात होणार असल्याचे आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे तालुक्यातील कलावंत आणि नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या