Advertisement

Responsive Advertisement

वाघोळ्याच्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतला आमरण उपोषणाचा इशारा
फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.गळक्या पत्र्यामुळे सर्व वर्ग खोल्या गळत असून विद्यार्थ्यांना बसायला सुद्धा जागा राहत नाही. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला नवीन शाळा खोल्या बांधकामासाठी प्रस्ताव दाखल करून संबंधित काम पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावे, अन्यथा दिनांक 17 सप्टेंबर 2022 पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून सर्व गावकरी पालक व विद्यार्थी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा ग्राम पंचायतीला निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंच . पुष्पा अरुण गायकवाड व ग्रामसेवक अमोल गायके यांना फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक विकास शेषराव गायकवाड, कोंडीबा सांडू गायकवाड, श्रीमंत साहेबराव गायकवाड, दगडू बाळा गायकवाड, काकाजी लक्ष्मण गायकवाड, कचरू बाबुराव गायकवाड, भिवराजी पांडू गायकवाड, बाबुराव किसन गायकवाड, समाधान नामदेव गायकवाड, कैलास जगन्नाथ गायकवाड, आत्माराम साडू गायकवाड, ज्ञानेश्वर रावसाहेब गायकवाड व छायाचित्रकार सचिन श्रीमंत गायकवाड यांच्या सह सर्व पालक व ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या