Advertisement

Responsive Advertisement

शिवसेनेशी नाळ सर्वसामान्य जनतेशी कायम जुळलेली - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे


औरंगाबाद दि. २१ (प्रतिनिधी) - सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वाईट सर्वसामान्य नागरिकांना वाटले. काहींनी अश्रूद्वारे वाट मोकळी केली तर काहींनी बंडखोरांविरोधात संताप व्यक्त केला. येणाऱ्या काळात धडा शिकवणारच अशी भीष्मप्रतिज्ञा मतदारांनी केली. यामुळे शिवसेनेशी नाळ सर्वसामान्य जनतेशी कायम जुळलेली असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे आज कान्याकोपऱ्यात विकास कामे सुरू आहे.
      महाराष्ट्र शासनाच्या अर्थ सहाय्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नाने राम मंदिर किराडपुरा ते रोशन गेट सिमेंट रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, 
माजी उपमहापौर मुजीब अलाम शाह खान, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, अल्पसंख्याक आघाडीचे अखिल शेख, राजू खरे लक्ष्मण गिरे, अतुल सरवदे आदींसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या