Advertisement

Responsive Advertisement

बामणी फाटा येथे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत


 हदगाव (ता.प्र.विकास राठोड ) हदगाव हिमायतनगर तालुक्याचे तिन वेळा आमदार व एका वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून काम केलेले माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी मधल्या काळात भारतीय जनता पाटी मध्ये कामकेले व त्या नंतर तिन वर्षानंतर  आपले  स्वर्गीय हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय  खासदार राजीव सातव यांच्या माध्यमातून  काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.पंरतु त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांची पक्षामध्ये घुसमट होत असल्याने ते अस्वस्थ होते.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते.त्यानी बुधवारी विस रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन  मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले असल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
 एकीकडे पक्षातील आमदार खासदार  नेते शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या गटात जात असताना माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी शिवसेना घरवापसी घेतलेला निर्णय शिवसेना कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या घरवापसी विषयी भावनिक लाट निर्माण झाली आहे. माजी खासदार सुभाषराव वानखेडे गुरुवारी सकाळी नांदेड येथून  हदगाव कडे जात असताना  हदगाव तालुक्यातील मनाठा बामणी फाटा बरडशेवाळा पळसा मानवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचे स्वागत केले. 
यामध्ये बामणी फाटा येथे  माजी पंचायत समिती सदस्य बंडु पाटील तांलगकर, बामणी फाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण, करमोडी संरपंच शिवराज पंचलिंगे, व्यापारी प्रशांत हानवते,बाबुशराव चव्हाण, साईराज साखरे,काशीराव भुरे,शेशेराव तुपकरी, गजानन पंतगे, सुनील आनेराव विशाल शिरफुले, विठ्ठलराव धरमुरे, जगताप उंचाडकर,सह परीसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बरडशेवाळा पळसा येथील  गोवींद ईजळकर, वसंतराव चौधरी, गजानन अंभोरे, प्रल्हाद पहाडे, राजु ईजळकर,   शंकरराव कदम, डॉ.गजानन कदम,  शंकर मुळे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या