Advertisement

Responsive Advertisement

सिल्लोड -सोयगांव तालुक्यातील आदिवासी कोळी समाज जातीचे प्रमाणापञ अभावी वंचित

सिल्लोड - 
संविधानिक अधिकार असुन सुद्धा सिल्लोड -सोयगाव तालुक्यातील कोळी मल्हार, कोळी महादेव, व टोकरे कोळी या अनुसूचित जमातीचे प्रमाणापञ देण्यास अधिकारी/कर्मचारी हेतुपुरस्कार टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर इत्यादी. कोळी मल्हार , महादेव कोळी,टोकरे कोळी जमातीचे उमेदवारांना पुढील शिक्षणापासून व विकासापासून वंचित राहावे लागत आहे. 
आपला कार्यालयात शेकडो अनुसूचित जमातीचे प्रमाणापञ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या अर्जदारांनी सादर केलेल्या प्रस्तावातील पुराव्याच्या साद्वविवेक बुद्धीने विचार करून त्याच्या नैसर्गिक न्याय हक्काचा विचार करावा व त्यांना कोळी मल्हार, कोळी महादेव,टोकरे कोळी,अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. सर्व प्रलंबित प्रकरणावर आपण कारवाई न केल्यास किंवा निकाली न काढल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागेल. 
तसेच सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी,शेतमजूर हे आदिवासी विकासाच्या जातीचे प्रमाणपत्र अभावी वंचित त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
वरील प्रमाणे सात दिवसांत निर्णय न घेतल्यास उपविभागीय आधिकारी कार्यालय,सिल्लोड सिल्लोड -सोयगांव तालुक्यातील कोळी मल्हार, कोळी महादेव,टोकरे कोळी,अनुसूचित जमातीचे समाज बांधव व आम्ही दि.25/07/2022 वार सोमवारी रोजी ठिक 10:30 वा.आपला कार्यालयासमोर नाईलाजास्तव आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन उपविभागीय आधिकारी कार्यालय,सिल्लोड आदिवासी कोळी समाज समन्वय मार्फत सखाराम बिऱ्हाडे अध्यक्ष, मराठवाडा विभाग आनंदा इंगळे मराठवाडा उपाध्यक्ष पांडुरंग साळवे जिल्हा समन्वयक आदिवासी कोळी समाज समन्वय महाराष्ट्र राज्य, विजेद्र इंगळे युवा अध्यक्ष औरंगाबाद, गणेश तायडे अध्यक्ष सिल्लोड तालुका, विष्ण भोटकर युवा जिल्हाकार्याध्यक्ष औरंगाबाद, कैलास गवळी युवा अध्यक्ष ता सिल्लोड तालुका , दिपक सोनवणे समन्वयक सोयगांव तालुका,गोपाल इंगळे युवा ता अध्यक्ष सोयगाव दिपक सपकाळ उपाजिल्हाअध्यक्ष, राजू सपकाळ (लेनापूर) उपाध्यक्ष सोयगाव आदि निवेदनावर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या