Advertisement

Responsive Advertisement

सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील भोळसर महिला औरंगाबाद बसस्थानकातून बेपत्ता

सिल्लोड- तालुक्यातील धानोरा येथील भोळसर महिला औरंगाबाद बसस्थानकातून बेपत्ता ; (प्रतिनिधी) दि 20
सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील कुशीवर्ताबाई संतोष काकडे (वय 35) ही भोळसर महिला औरंगाबाद येथील बसस्थानकातून बेपत्ता झाली असून वडिल जनार्दन राणुबा गुळवे यांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार क्रांती चौक पोलीसांत दाखल केली आहे.
   वडिल जनार्दन गुळवे सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील रहीवासी असुन हलाखीचे जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी औरंगाबाद - चितेगाव येथील एका कंपनीत वाचमेन आहेत तसेच दोन्ही मुलेही कामानिमित्त अनेक वर्षांपासून औरंगाबाद येथे स्थायिक आहेत. 
चौदा - पंधरा वर्षांपूर्वीच कुशीवर्ताबाईचा विवाह धानोरा येथील संतोष काकडे यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांकडे सात - आठ वर्षांपासून आजारी - भोळसर अवस्थेत राहत असलेली कुशीवर्ताबाई संतोष काकडे ही महिला औरंगाबाद येथील बसस्थानकातून सोमवार (दि 18) रोजी बेपत्ता झाली असुन वडिल जनार्दन गुळवे यांनी येथील क्रांती चौक पोलीसांत बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली असुन आढळल्यास मो. नं. 9588449819 - 9834776363  वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या