Advertisement

Responsive Advertisement

पत्रकार हल्ला प्रकरण....सोयगावला पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.....जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल...


  

  सोयगाव -> (विजय पगारे)
सोयगाव शहरातील वाळू माफियाने एका दैनिकाचे पत्रकार ईश्वर इंगळे यांचेवर टिप्परचे फोटो कास्धाल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना रविवारी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात घडली होती.यावरून पत्रकार ईश्वर इंगळे यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून अचूक तपासाअंती अखेर उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे यांनी मंगळवारी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अमोल नारायण  हिरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक सकाळचे पत्रकार ईश्वर गजमल इंगळे हे वृत्त संकलनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात जात असतांना त्यांचा पाठलाग करत आलेला वाळूमाफिया अमोल हिरे यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात थांबवून त्यास माझ्या टिप्परचे छायाचित्र का काढले असे संबोधून तुझी पत्रकारिता मीच पाहून घेईल असे उद्गार काढून तू काय करशील  असे शब्द वापरून त्याचेवर शिव्यांची लाखोली वाहून त्यास मारहाण केली होती.यावरून ईश्वर इंगळे यांनी सोयगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी फिर्यादीचा अचूक कायद्याचा अभ्यास करून अखेरीस मंगळवारी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था(हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी घटनस्थळ भेट देवून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित,जमादार राजू बरडे,सादिक तडवी,रवींद्र तायडे,आदी तपास करत आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या