Advertisement

Responsive Advertisement

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच शिक्षा देते, हा इतिहास आहे- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे


छत्रपती संभाजीनगर :  ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी सदैव जनतेला न्याय मानले आहे. अनेकदा खुद्द न्यायालयात जाहीर वाक्य सांगितले आहे. त्यामुळे आता गद्दार बंडखोरांना जनता न्यायालयात जावे लागेल. त्यामध्ये शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच शिक्षा देते, हा इतिहास आहे. हा निकाल लवकरच सर्वांसमोर येईल. यापूर्वी जनतेने बंडखोर खासदार, आमदारांसह मुख्यमंत्री यांना पराभूत केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
     संभाजीनगर येथे सौभाग्य मंगल कार्यालयात युवासेना संभाजीनगर चा निष्ठा मेळावा दणदणीत पार पडला.  शिवसेनेचे ४० आमदार शिंदे सोबत गेले, त्यांनी निष्ठा विकून गद्दारी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी येणारया निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. यासाठी युवासेनेने आपली ताकद दाखवून द्यावी, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा चंद्रकांत खैरे यांनी केले.
 या मेळाव्याला जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, अविनाश गलांडे पाटील, राजेंद्र राठोड, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, युवासेनेचे उपसचिव ऋषीकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, शुभम पिवळ,  माजी नगरसेवक मोहन मेघावाले, किशोर नागरे, स्वाती नागरे, भाविसेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ, विजय सुबुकडे, शहर युवाधिकारी सागर खरगे, शेखर जाधव,  जिल्हा समन्वयक संदीप लिंगायत, सरचिटणीस किरण तुपे, नारायण सुरे, सतिश पवार, योगेश पवार, बाबासाहेब घुगे, मनाजी मिसाळ, रमेश इधाटे, राजू खरे, बळीराम देशमाने, विकास लुटे, रोहीत स्वामी, देविदास रत्नपारखी, नंदू म्हस्के, दत्ता शेलार, अजय चोपडे, यश पागोरे,  दिनेश तिवारी, स्वप्नील डिंडोरे, अक्षय दाभाडे, मधूर चव्हाण, तालुका युवाधिकारी ऋषीकेश धाट, विकास गोर्ड, आकाश लंबे, राजु तायडे, राहुल वाणी, सागर वाघचौरे, करण सुरे, नागेश थोरात, ऋषी मुळे, नितू मानकापे, हर्ष त्रिभूवन, योगेश पोळेकर, शुभम त्रिभूवन, आकाश जैन, राहुल पेरे, अजय रेडडी, राज मेघावाले, सागर भारस्कर कृष्णा मोटे, कुशल हरणे, आकाश हिवाळे, अस्तिव देवतवाल, अनिल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीही गद्दार आमदारांना जागा दाखवून देण्यासाठी युवा सेनेच्या पाठीशी आम्ही शिवसेना पदाधिकारी खंबीरपणे उभे आहोत, गद्दाराने युवासेना खासगी मालमत्ता केली होती. युवा सेनेतील कार्यकर्त्यांना जाच केला जात होता. आता युवा सेना या जाचातून मोकळी झाली आहे. त्यामुळे गद्दारांना धडा शिकविण्यासाठी युवा सैनिकांनी घरा-घरापर्यंत पोहचवून आपले कार्य करावे.
निष्ठा मेळाव्यात युवा सेनेच्या पदाधिकारी अणि सैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुरुवातीला त्यांनी गगनभेदी घोषणाबाजी केली. त्यानंतर युवा सेनेचे ऋषीकेश खैरे, हनुमान शिंदे,  सागर खरगे, मच्छिंद्र देवकर, अजय चोपडे यांनी भाषणातून गद्दारा विषयी संपप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निष्ठा मेळावा आयोजित केला जाईल,अशी माहिती युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या