Advertisement

Responsive Advertisement

वनविभागाकडून मृत अवस्थेतील मिळून आलेल्या बिबटयावर अंत्यसंस्कार...


सोयगाव-(विजय पगारे)
----------
सोयगाव तालुक्यातील  मौजे वरखेडी खुर्द शिवामधील गट क्रमांक ४५  शेतात  अजिंठा वन परिक्षेत्राच्या हद्दी मध्ये गंगाबाई रघुनाथ जाधव यांच्या शेतात एक वन्य प्राणी नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळुन आला.(ता.२७) बुधवारीच यावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले आहे.
माहिती मिळताच अजिंठा वनपरिक्षेत्र अधीकारी  यांच्या सह अजिंठा वनपरिक्षेत्र  त्यांची पुर्ण टिम सह घटनास्थळी झाले दाखल झाले होते.
  ता.२७ बुधवारी रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या दरम्यान मौजे वरखेडी खुर्द  शिवरातील गट क्रमांक  ४५ या  शेतामध्ये एक वन्यप्राणी बिबट मृत अवस्थेत पडलेला असल्याची असल्याची खबर अजिंठा वनपरिक्षेत्र यांना प्राप्त होताच  वनपरीक्षेत्र अधिकारी अजिंठा निलेश सोनवणे यांच्यासह अजिंठा वनपरीक्षेत्राचे वनपाल .सय्यद, शिंदे, गवंडर, राठोड ,  तसेच वनरक्षक जाधव, देवकर, दांडगे, चाथे ,बोरसे, केंद्रे व इतर कर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले. सदर ठिकाणी एक नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला.त्याचे वय अंदाजे पाच ते साडेपाच वर्षे असून वजन ६० किलो होते . सदर प्रकरणात स्थळ पंचनामा नोंदवून वनरक्षक अजिंठा यांनी वनगुन्हा नोंद केला. दरम्यान वनपरीक्षेत्र कार्यालय अजिंठा येथे मृत बिबट्याचा वन्यप्राण्याचे डॉक्टर  रमण इंगळे, डॉ .नौशाद शहा, आणि डॉ .राकेश चव्हाण, तीन  पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ यांच्या पथकाकडून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत वन्यप्राण्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरची कायदेशीर प्रक्रिया  मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद वनवृत्त  सत्यजित गुजर  , उपवनसंरक्षक औरंगाबाद वनविभाग सूर्यकांत मंकावार , आणी  सहाय्यक वनसंरक्षक  पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, वनपाल सय्यद, शिंदे, गवंडर, राठोड तसेच अजिंठा वन परीक्षेत्रातील वनरक्षक, वनमजूर यांनी पूर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या