Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा’ अभियानातूनराष्ट्रीयता, एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


        मुंबईदि. 17: केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे राज्यातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपालसर्व राज्यांचे मुख्यमंत्रीकेंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

            आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदेगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलछत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेलउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डीझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालनागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओआसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

            या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

            ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे. आपल्यामधील राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरीमहिलाशाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्थावेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.  राज्यस्तरजिल्हास्तरतालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यविराची आठवण आपण ठेवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्यत्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणारे हे अभियान राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या