Advertisement

Responsive Advertisement

सोयगांव केंद्रातर्गंत विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सहली सह वृक्षारोपणाचा आनंदा...

सोयगाव/विजय पगारे
----------------------------
      सोयगांव केंद्रा अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर, केंद्रीय शाळा सोयगांव, प्राथमिक शाळा आमखेडा या शाळांची निसर्गसहल व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोयगांव केंद्रांचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसवाडी डोंगरावर आयोजन करण्यात आले.यावेळी तीघं शाळेतील जवळपास५०० विद्यार्थी या निसर्ग सहलीत व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. *"शुध्दतेची हमी","प्रदूषण कमी","लावा एक कलम","मेहनतीने करा संगोपन","सफल झालयं वृक्षारोपण"* या युक्ति प्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक,केंद्र प्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य नगरसेवक यांनी सोनसवाडी डोंगरावर नगरपंचायत सोयगांव यांच्या सहकार्याने विविध प्रजातींचे वृक्षारोपण करून रोपण केलेल्या रोपांचे संगोपन करून वाढी लावण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.याचबरोबर सोनसवाडी डोंगरावर रामजीनगर येथिल विद्यार्थ्यांनी जमविलेल्या जवळपास दोन हजार लिंबांच्या बियांचे रोपणही करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी निसर्ग सहलीचा , वेगवेगळ्या खेळांचा त्याच बरोबर निसर्ग भोजन व मध्यान्न भोजन,पुरक आहाराचा ही मनसोक्त आनंद घेतला.आज जणू या तिघं शाळेची बिनभितींचीच शाळा भरलेली होती.यावेळी वृक्षारोपणाचे महत्व व काळजी या विषयी *मुलांना द्यावे एकचं शिक्षण वसुंधरे मुळे आहे आपले रक्षण*  या युक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख फिरोज तडवी,किरण पाटील,रामदास फुसे,किशोर जगताप,झगाजी पोतरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सोयगांव येथील नगरसेवक गजानन कुडके,सोयगांव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी, रामजीनगर शालेय व्यवसापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे,आमखेडा येथिल अध्यक्ष विश्वनाथ कोथलकर ,रामजीनगर येथील सदस्य राजेंद्र माळी,केंद्रीय मुख्याध्यापक  रामदास फुसे,मोतीराम जोहरे,रामजीनगर येथील मुख्याध्यापक किरण पाटील आमखेडा मुख्याध्यापक सविता पाटील,प्रशांत पाटील,झगाजी पोतरे,नसीर शेख,सय्यद शेख,सुदर्शन चौधरी,आसिफ देशमुख,किशोर जगताप,संगीता सोनवणे,मंगला बोरसे,स्वाती पतिंगे या शिक्षकांनी सहभाग घेतला तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिका कर्मचारी भास्कर श्रीखंडे,संजय कोळी,आशा फुंड,संजय मिसाळ,ज्ञानेश्वर सुतार यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या