Advertisement

Responsive Advertisement

आला धार्मिक सणा-वाराचा व्रत वैकल्याचा श्रावणमास....


 सोयगाव-(विजय पगारे)
----------------------------
मराठी वर्षातील बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र असा व्रतवैकल्याचा व धार्मिक सणावाराचा महिना म्हणजे श्रावण मास. यंदा शुक्रवारपासून  श्रावण मासारंभ होत आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती.
 गर्दी होऊन आजार पसरु नये, याकरिता ही खबरदारी घेण्यात आली होती. दोन वर्षानंतर आता यंदाच्या वर्षी श्रावण फेरीचा आनंद घेता येणार म्हणून भाविक, पर्यटक आनंदात आहेत. शिवाय या महिन्यात सर्वाधिक सुट्ट्या असल्याने भाविक आणि पर्यटकांना सलग सुट्ट्यांची जणू पर्वणीच लाभली आहे.
   या महिन्यात जास्त पाऊसदेखील असल्याने परिसराचे निसर्गसौंदर्य फुललेले असल्याने औरंगाबाद  जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरीलही पर्यटक मोठ्या संख्येने  तालुका परिसरातील नद्या, नाले, धबधबे, निसर्गसौंदर्याची लयलूट करण्याकरिता गर्दी करतात. येथे केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर शहरालगत नारळीबाग मधील पुरातन शिवमंदिर,गवळीनीच्या नाल्यावरील महादेव मंदिर, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेताळवाडी पुरातन किल्ला् ,रूद्रेश्वर लेणी, वसई किल्ला,काळदरी किल्ला,घटतकोचलेणी  बनोटी सर्कल मधील धारकुंड, तालुक्याच्या सिमेवर जाईचा देव , मुरडेश्वरदेव महादेव मंदिर,  पर्यटनस्थळे आहेत. तसेच नाट्य पंढरी सोयगाव येथुन झळझळवाहनारी उगमस्थान असलेली सोना नदी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथुन उगमस्थान वाघुर नदी,सातकुंड तेथुन उगमस्थान हीवरानदी,मनुदेवी परिसरातुन उगमस्थान असलेली मनु नदी दोन नद्यांचा संगम वरठाणगावाजवळ होतो.पुढे दोन्ही नद्या खडकदेवळा नयनात जि.जळगाव सामावते, सावळदबारा सर्कल दावनेश्वर येथुन छगन पावनारी कांगनदी,जाईदेव परिसराच्या खो-यातुन उगम पावलेली नदी  सोयगाव नगरीत श्रावण महिन्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.

यावर्षी गुरुवारी २८ दीप अमावास्या असून, शुक्रवार २९ पासून श्रावण महिना सुरु होत आहे. या महिन्यात दर श्रावण सोमवारी लाखो भाविक प्रदक्षिणा करतात.

सुट्ट्यांचा महिना.....
 
*या महिन्यात श्रावण ३१ जुलै ७, १४, २१ ऑगस्ट असे चार रविवार आहेत. या महिन्यात उपवास करण्यासाठी पाच शनिवार ३० जुलै ६ ऑगस्ट १३,२०,२७ ऑगस्ट, तर सोमवार १.८ १५.२२ ऑगस्ट रोजी येत आहेत. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, ऑगस्टला नागपंचमी,तर त्याच दिवशी मंगळागौरदेखील आहे. ११ ऑगस्टला रक्षाबंधन आहे.

* त्यानंतर दुसरा शनिवार, रविवार, भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि १६ तारखेला पारशी न्यू इअर, त्यामुळे १३पासून १६ ऑगस्टपर्यंत पुन्हा सलग चार दिवस सुट्टी असल्याने रुद्रेश्वर प्राचीन लेणी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि परिसरात पर्यटक व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. 
 
*  या पार्श्वभूमीवर श्रावण मास नियोजनाच्या प्रशासकीय बैठका घेतल्या जात असून, त्याद्वारे नियोजन केले जात आहे.
---------------- फोटोऔळी --------------------
१)सोयगाव तालुक्यातील वैभव जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ,२) पुरातन वेताळवाडीस्थीत वाडीकिल्ला,३)रुद्रेश्वर लेणी व वाहनारा धबधबा,४) रुद्रेश्वर येथील शीवलिंग,५)रुद्रेश्वर येथील भगवान गणेशामुर्ति,६) अजिंठा लेणी सातकुंड व झळझळ वाहनाला धबधबा ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या