Advertisement

Responsive Advertisement

केळीच्या बागेत गांजाची लागवड करणाऱ्याला ठोकल्या बेड्या एक लाख,एकविस हजार, पन्नास रु. रुपये किंमतीचा २४ किलो गांजा जप्त...

सोयगाव-विजय पगारे
~~~~~~~~~~~~
 फर्दापूर ता.सोयगाव  पोलिसांची मोठी कारवाई . मंगळवारी (ता. २६) फर्दापुर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. बी. वाघमोडे यांना एका  गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रवळा शिवारातील शेती गट क्रमांक ०९ मध्ये गांजा सारखी झाडे आहेत. धागा सापडल्याने लागलीच या माहीतीच्या आधारावर रवळशिवारातील गट नं.९ मध्ये पोलीस पथकासह आणि राजपत्रीत अधिकारी, कृषी पदविकाधारक अधिकारी  जाऊन सदर शेताची पाहणी केली असता, शेतात असलेला शेतकरी रामचंद्र  शिंदे रा. रवळा यास मिळालेल्या माहीतीची थोडक्यात हकिगत सांगीतली . व सदर शेताची सर्वांनी पाहणी केली असता शेतकरी रामचंद्र  शिंदे याचे मालकीचे शेतात केळी पिकाच्या अंतर्गत गांजासारखी दोन झाडे दिसुन आली. अधीक चौकशीत रामचंद्र शिंदे शेतकऱ्यांच्या शेतात  यांच्या शेतातून २४ किलो २५० ग्रॅम वजनाचा एकुण किंमत १,२१, ०५० रुपये किंमतीचा हिरवा पाला असलेला गांजा नावाचा अंमलीपदार्थ माल जप्त करण्यात आला. फिर्यादी सपोनि देविदास बाळासाहेब वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक फर्दापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी यांचे विरुध्द फर्दापूर पोलीस ठाणेत एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक  आर. जी. कासले पोलीस उप निरीक्षक फर्दापूर पोलीस ठाणे अंतर्गत हे करीत आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, विजयकुमार मराठे यांचे मार्गदर्शनाखाली फर्दापुर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वाघमोडे, निलेश लोखंडे,योगेश कोळी, प्रकाश कोळी,सतिष हिवाळे,पंकज व्यवहारे यांनी केली आहे.पुढील तपास करत आहे यामुळे इतर चोरून गांजा लावाण्ऱ्या शेतकऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या