Advertisement

Responsive Advertisement

ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी माजी आमदार अष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाहदगाव ( ता.प्र.विकास राठोड )
        हदगाव हिमायतनगर तालुक्यात मागील २० दिवसापासून  पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने हदगाव हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शेतकरी नेते लक्ष्मण वडले यांच्या प्रमुख उपस्तीतीत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         हा मोर्चा सुमन मंगल कार्यालय डोंगरगाव रोड इथून निघून हजारोंच्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक सामील होऊन तहसील कार्यालय येथे धडकला या मोर्चाद्वारे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी निवेदन मार्फत म्हटले की यंदाच्या खरीप हंगामात अनेकदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातचे गेले आहे. हदगाव हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसात मुसळधार व संततधार पाऊस पडल्याने पिके पिवळी होऊन नष्ट झाली आहेत,लहान ओढे, नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे चक्क वाहून गेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतामध्ये जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाल्याने पिके पाण्याखाली गेली. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, तुर, तीळ, मुग, उडीद या पिकांचे शेत जमीनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नालेही तुडूंब भरून वाहत आहेत. सुरूवातीला पावसाने उघडीप दिल्याने पिके निघालीच नाही, दुसऱ्यांदा पेरणी केलेली पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी फार अडचणी सापडला आहे त्यात सावकारी कर्ज आणि बँकांचे कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत शेतकरी अडकला. दुहरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणुन दोन्ही तालुक्यातील झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता दोन्ही तालुक्यात शेतकन्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्या साठी ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार द्यावा असे निवेदन देऊन सुमन मंगल कार्यलय येथे येऊन विसर्जित झाला. या मोरच्यांचे नंतर सभेत रूपांतर होऊन या सभेत बोलताना माजी आमदार नागेश पाटील म्हटले की सच्चा शिवसैनिक हा शिवसेनेची जोडलेला आहे हे आजच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीतून दिसून येत आहे 
           या मोर्चास युवा शिवसेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील अष्टीकर तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, जॅकेर च्याऊस, उपजिल्हाप्रमुख रमेश घंटाळवर, शहर प्रमुख राहुल भोळे, नगरसेवक शिवा चंदेल, गजानन शिंदे, जि. प. सदस्य गजानन गंगासागर, हदगाव सेवा सोसायटी संचालक ज्ञानेश्वर जाधव, प्रभाकर पत्तेवार, तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या