Advertisement

Responsive Advertisement

सोयगावला पिकविम्याच्या प्रचार रथाला हिरवा झेंडा,सोयगाव तालुक्यात दोन वाहने रवाना..  
  सोयगाव(विजय पगारे)
~~~~~~~~~~~

खरिपाच्या पिक विम्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कृषी आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी सोयगाव तालुक्यात दोन पिक विम्याचे प्रचार रथ रवाना करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी दिली.

सोयगाव तहसील कार्यालयातून दोन्ही प्रचार रथ रवाना झाले असून  तहसीलदार रमेश जसवंत व तालुका कृषी अधिकारी श्रीमती संगीता पवार, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे प्रचार रथ रवाना करण्यात आले,यावेळी  नायब तहसीलदर गोरखनाथ सुरे,मंडळ कृषी अधिकारी श्री. जे.के.जाधव, एस जी वाघ , हेमंत देशमुख पिक विमा प्रतिनिधी  गजानन जाधव, आदी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले की,राज्यात पावसाचे कमी अधिक प्रमाण असल्यामुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास,त्याची भरपाई आपल्याला मिळावी म्हणून,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व आपल्या पिकाचा विमा काढून आपले पीक संरक्षित करून घ्यावे असे आव्हान केले.या वर्षी पीक विमा भरण्यासाची शेवटची मुदत ३१ जुलै आहे तरी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न  बघता  आजच जवळच्या csc सेंटर किव्हा बँकेत जाऊन आपल्या पिकाचा विमा काढावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या