Advertisement

Responsive Advertisement

अजिंठापर्वत रांगेतील टिटवीत जंगली प्राणी अस्वल आढळले मृत अवस्थेत


सोयगाव(विजय पगारे)
~~~~~~~~~~~~
टिटवी ता.सोयगाव शिवारातील जंगलात कक्ष क्र.५३०,गट क्र.३१मध्ये गुरुवारी (ता.२८)सायं.नर जातीचा अस्वल आढळला  ता. २७ बुधवारी सुद्धा वरखेडी खुर्द गट क्र.४५ नरबिबट्या मृत अवस्थेत मिळुन आला होता. जनु वन्यप्रण्यावर संकटच आल्याचे बोलल्या जात आहे. वन्य जिव प्रेमींमध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
             वनपरिक्षेत्र अधीकारी सोनवणे अजिंठा यांच्या सह परिमंडळ सावळदबारा चे वनपाल अविनाश   राठोड , शिंदे ,तसेच वनरक्षक चाथे , जाधव , राठोड ,वाघ , खर्डे , नन्नावरे ,बेराड ,आणि वन मजुर
अजिंठा वन परिक्षेत्र टिटवी कक्ष क्रमांक ५३०, गट क्रमांक ३१ मधील राखीव वनांमध्ये  एक अस्वल मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती वन विभागाला कळताच विलंब नकरता घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना एक नर अस्वल मृत अवस्थेत आढळुन आले त्याचे वय अंदाजे अकरा ते बारा वर्ष असुन १२० ते १२६  किलो त्याचे वजन  होते 
वरखेडी खुर्द येथील मृत बिबट्या ची घटना ताजी असतानाच पुन्हा ...
ही अस्वलाची घटना घटली  जाईचादेव मंदिर आणि कालिंका देवी मंदीर या दोन मंदिरांच्या   डोंगर द-यामधे दहा पैसे म्हनुण एक खोरा आहे त्या खो-याच्या बाजुला  अस्वल मृत अवस्थेत आढळुन आले 
 सदर प्रकरणात स्थळ पंचनामा नोंदवून वनरक्षक टिटवी यांनी वनगुन्हा नोंद केला असुन वन्यप्राणी अस्वल हा डोंगर उतारावरून घसरून पडला असल्याची शक्यता असून त्याचा मृत्यू अंदाजे ४ ते ५ दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यानंतर टिटवी कक्ष क्र ५३० येथे मृत अस्वल वन्यप्राण्याचे डॉ. रमण इंगळे, डॉ .नौशाद शहा,  डॉ. राकेश चव्हाण तीन पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ यांचे पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले. सदर वन्यप्राण्याच्या शरीरात अळ्या पडल्यामुळे आणि कुजल्यामुळे त्याच्या महत्वाच्या अवयवाचे नमुने पुढील तपासणीकामी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी घेता आले नाहीत .तदनंतर मृत वन्यप्राण्याचे त्याच जागेवर सरण रचून दहन करण्यात आले. सदरची कायदेशीर प्रक्रिया  मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद वनवृत्त  सत्यजित गुजर ,उपवनसंरक्षक औरंगाबाद वनविभाग सूर्यकांत मंकावार आणि सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी  सोनवणे, वनपाल  राठोड , शिंदे, वनरक्षक तसेच अजिंठा वनपरीक्षेत्रात कार्यरत वनमजूर यांनी पूर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या