Advertisement

Responsive Advertisement

कंकराळा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांची सदिच्छा भेट ...

सोयगाव -> (विजय पगारे) 

कंकराळा ता.सोयगाव ग्रामपंचायत कार्यालयला बुधवारी (ता.२०)  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांनी सदिच्छा भेट दिली. 

यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. चंदाताई शिवदास राजपुत यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत १३ -१५ ऑगस्टपर्यंत  "हर घर तिरंगा " उपक्रम गावात राबविण्यात यावा आणि गावातील पात्र नागरीकांना बुस्टर डोस देण्यात यावे यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या, तसेच विविध शासकीय योजनां विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी थोडेसे मायबापासाठी जेष्ठ नागरिक कक्षास भेट देऊन वृद्ध व्यक्तीं सोबत चर्चा केली , ग्रामपंचायत परीसरात वृक्षारोपण करण्यात आले .  
उपस्थित पंचायत समिती सोयगाव येथिल गटविकास अधिकारी प्रकाश नाईक , पंचायत विस्तार अधिकारी बी.टी.साळवे , सरपंच सौ. चंदाताई राजपुत, उपसरपंच सौ.मनिषा जैस्वाल , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , माजी सरपंच शिवदास राजपुत , शाळा समिती उपाध्यक्ष भगवान ढाकरे , युवानेते कुणाल राजपुत , शिक्षक महेश गवादे, ग्रा.प.सदस्य राहुल बोराडे, अंगणवाडी सेविका शोभाबाई बिंदवाल, मदतनीस संगिताबाई बडकणे, रोजगार सेवक प्रताप उबाळे,जलसेवक दिपक राजपुत, समाधान पाटील, हिरालाल ढाकरे, रुमसिंग राजपुत, बाबुराव लव्हाळे, परमेश्वर राजपुत, शांताराम लव्हाळे, भिकाभाऊ ताटु, विठ्ठल बडकणे, शांताबाई शिंदे आदी शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या