Advertisement

Responsive Advertisement

सोयगांव येथे खरीप हंगाम २०२२ अंतर्गत पिक कापणी प्रशिक्षण संपन्न...

सोयगाव/विजय पगारे
---------------------------
सोयगांव तालुक्यात आर.बी.जसवंत तहसिलदार सोयगाव व प्रकाश नाईक गट विकास अधिकारी सोयगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवन पंचायत समिती सोयगांव येथे (ता. २८)  गुरुवारी  तालुक्यातील ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच व पोलिस पाटील यांचे पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

सदारच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जे. के. सुरे नायब तहसिलदार सोयगांव यांनी ई – पिक पाहणी या बाबतची माहिती दिली. एस. बी. पवार तालुका कृषि अधिकारी, सोयगांव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगून पिक विमा योजनेची माहिती दिली. एस. जी. वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी यांनी पिक कापणी प्रयोग करतांना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली. आर. डी. फुसे, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय सिल्लोड यांनी पिक कापणी प्रयोगाबाबतचे मार्गदर्शन केले. एच. बी. देशमुख कृषि पर्यवेक्षक, सोयगांव यांनी तालुक्यात सन २०२२-२०२३ मध्ये वाटप करून देण्यात आलेल्या विविध पिकांच्या पिक कापणी प्रयोगांची माहिती दिली. गजानन जाधव विमा प्रतिनिधी सोयगांव यांनी ऑनलाइन पिक विमा कसा भरावा व कुठल्या पिकाला किती हप्ता व विमा संरक्षित रक्कम किती आहे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पी. आर. वाघ कृषि सहाय्यक, घोसला यांनी केले व डि. एस. साळुंखे कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, सोयगांव यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या