Advertisement

Responsive Advertisement

किनवटच्या वनात फुलंलय दुर्मीळ वादा / रास्ना ऑर्किड --बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये घेतली नोंद

                   सिल्लोड---जैवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात सह्याद्रि, सातपुड्याच्या व्यतिरिक्त मोठे घनदाट जंगल क्षेत्र नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात आहे. याच किनवट वन  विभागाच्या डोंगरगाव वन क्षेत्रात विपुल वन संपत्ती आढळते. नुकतेच या वनक्षेत्रात जैवविविधता या विषयावर अभ्यास करणाऱ्या सिल्लोड येथिल अभिनव प्रतिष्ठान च्या डॉ.संतोष पाटील यांना ऑर्किड प्रजातीच्या  दुर्मिळ व उपयोगी असणारे वांदा/रास्ना हे ईपीफायटिक ऑर्किड पुष्प उमललेले आढळले आहे. पश्चिम घाटात ,दक्षिने कडील वनात उमलणारे वांदा ही सपुष्प वनस्पती आहे.सदर प्रजाती ही नेहमी दुसऱ्या झाडावर उगले मात्र इतर बांडगुळा प्रमाने ती परपोषी नसून ती स्वतः चे अन्न स्वतः बनवते व फक्त वाढी साठि दुसऱ्या झाडाचा आधार घेते.हवेतील बाष्प शोषून ती अन्न निर्माण करते,.हे ऑर्किड सागाच्या झाडावर उंच ठिकाणी अधिवास केलेले आढळुन येत आहे. जूनचा शेवट ते जुलै मध्या पर्यंत ही  निळसर जांभळी ,सुवासिक फुलं उमलतात व ,ती 20 दिवसांपर्यंत टिकून असतात.सुरुवातीला उष्ण व नंतर दमट हवामान या जातीच्या वाढीस आवश्यक असल्याने तसे हवामान किनवटच्या जंगलात असल्याने हीचा इथे मुक्त अधिवास आहे.पूर्ण मराठवाड्यात आजवर याची अधिकृत नोंद नव्हती मात्र या निमित्ताने डॉ.पाटील यांनी केंद्राच्या बॉटनीकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्यें ही   दुर्मीळ व औषधोपयोगीं जैवविविधता आज नोंद केली आहे.     

           प्राचीन आयुर्वेदात  रास्ना म्हणून उल्लेख
- या ऑर्किड चे शास्त्रीय नाव   वांदा टेसेलेटा असे असून यास स्थानिक आदिवासी बांधव बांदा किंवा रास्ना असे म्हणतात. याची मुळे ही संधी वात ,दमा, ज्वर नाशक म्हणून आयुर्वेदात वर्णन केलेली आहे. याच्या मुळांचे तेल बनवुन व ते फ्रॅक्चर झालेल्या  हाडास जोडण्यासाठि व वेदना शामक म्हणून पुर्वी वापरत असत.याचे गुणधर्म अत्यन प्रभावी असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे-- 
डॉ.संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक,सिल्लोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या