Advertisement

Responsive Advertisement

वडगाव (को) बजाजनगर ग्रामपंचायतीवर डौलाने भगवा फडकवा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरेऔरंगाबाद दि. २५ (प्रतिनिधी) -  औद्योगिक वसाहत असलेल्या वडगाव कोल्हाटी, बजाजनगर येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात. या भागात सेवा, सुरक्षा आणि विकासासाठी शिवसेना सदैव तत्पर असते.
त्यामुळे आगामी काळात सर्वांगीण विकासासाठी वडगाव (को) बजाजनगर ग्रामपंचायतीवर डौलाने भगवा फडकवा. कामगार व नागरिकांच्या आशिर्वादाने संभाजीनगर पश्चिम शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
संभाजीनगर पश्चिम विभागात शिवसेना उमेदवार यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते पार पडले.
शिवसेनेसह अंगीकृत संघटना भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कामगाराच्या अनेक अडचणी व समस्येवर शिवसेना रामबाण उपाय आहे. अनेक निवडणूक येतात आणि जातात, मात्र इथला मतदार शिवसेनेच्या पाठिशी कायम असतो. त्यामुळे यापुढे कामगार व नागरिकांच्या सुखदुःखात शिवसैनिक भक्कमपणे उभा राहिल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, आनंद तांदूळवाडीकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड,भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, सरपंच सचिन गरड, कैलाश भोकरे, विजय सरकटे, रघुनाथ शिंदे, सागर शिंदे, करण साळे, नितिन देशमुख, गणेश घुले,  महिला आघाडीच्या मीरा पाटील, मीना राठोड, अलका शिंदे, छाया जाधव, आदींची उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या