Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित समृध्दी महामार्गावरिल 10 कि.मी. मॅरेथॉन -2022 स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद.. 2650 स्पर्धकांनी नोंदवीला सहभाग


औरंगाबाद-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, व मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन आज समृध्दी महामार्ग, सावंगी टोलनाका जवळ, 10 किमी  मॅरेथॉन-2022 स्पर्धा अत्यंत उत्साहत पार पाडली.  यावेळी समृध्दी महामार्गावर जल्लोष पुर्ण वातारण निर्माण झालेले बघायला मिळाले, समृध्दी महामार्गावर पहिल्यादांच आयोजित या मॅरेथॉन मध्ये सर्व साधारण गटात 1750 स्पर्धक ज्यात तरूण- तरूणी, माध्यम प्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, महिला तसेच 900 पोलीस व होमगार्ड असे एकुण 2650 स्पर्धकांनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला आहे.
मा. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे सह मा. सुनिल चव्हाण, जिल्हाधिकार, औरंगाबाद, जी. श्रीकांत जॉईंट कमिशनर, जी.एस.टी.,मा. निलेश गटणे, सी.ई. ओ. जि.प. औरंगाबाद श्री. निमित गोयल, समादेशक, आर.आर.बी.-14, मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, औरंगाबाद या मान्यवरांनी आज सकाळी 07.00 वाजेला हिरवा झेंडा दाखवुन स्पर्धेला सुरूवात केली आहे.
या 10 किमी मॅरथॉन स्पर्धेतील विजेतेत्या मध्ये 1) पुरूष गट ( पोलीस /होमगार्ड विभाग) प्रथम क्रमांक :- किशोर विठ्ठल मरकड वेळ : 31.52 मिनीटे , द्वितीय क्रमांक : प्रविण भाऊसाहेब सांगळे वेळ : 38.25 मिनिटे तृतीय क्रमांक : गुरूमुखसिंग फुलसिंग सुलाने वेळ : 40.33 मिनिटे .
2) महिला गट (पोलीस /होमगार्ड विभाग) : प्रथम क्रमांक: पुजा तानाजी ढवळे वेळ : 60.20 मिनीटे, द्वितीय क्रमांक सुशिला रमेश पवार वेळ : 69.48 मिनिट तृतीय क्रमांक मोहिनी चंद्रकांत लंबे वेळ: 72.07 मिनिटे.
3) सर्वसाधार (पुरूष गट)
 प्रथम क्रमांक : सिध्देश्वर अल्हट वेळ 42.89 द्वितीय क्रमांक: कुलदिप चव्हाण वेळ 43.28 तृतीय क्रमांक: धरम भवरे वेळ: 45.00 मिनिटे 
4)सर्वसाधारण (महिला गट)
प्रथम क्रमांक: शितल सुपडू जाधव वेळ: 58.06 द्वितीय क्रमांक: बाबर परिमला बसालसाहेब वेळ : 59.43 मिनिटे तृतीय क्रमांक : सुहानी सुधीर खोब्रागडे वेळ : 61.20 मिनीटे.
यातील सर्व गटातील प्रथम विजेत्यास स्पोर्ट सायकल, द्वितीय विजेत्यास ओव्हन, तर तृतीय विजेत्यास मिक्सर ग्राईडर पारितोषिक म्हणुन वरिल नमुद मान्यवरांचे हस्ते देण्यात आले आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
या 10 किमी मॅरेथॉन स्पर्धेस यशस्वीरित्या आयोजित करण्या करिता औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलास वेरॉक कंपनी ग्रुप श्री. सतिष मांडे व राहुल टेकाळे, अलाना ग्रुप कंपनी दिपक कुमार मेहता, कॅनरा बँक पंकज गजभीये, उत्तम ऍ़नर्जी विकास कांबळे, अजिंठा  फार्मा लि. व्यापारी असोशीएशन चे पवन लोहिया, स्वास्तीक एजन्सी राधेश्याम तोष्णीवाल,स्टिपिंग स्टोन स्कुल राजित खान, उडरिच स्कुल रणजित खोडे, महिंद्रा सी.आय.ई ऑटोमोटीव्ह चे सुरेश चंद्राव सत्यनारायण दायमा, प्रदिप मानकापे, रायन इन्टरनॅशनल स्कुल तसेच अजित मेटे, भगवान मते (कॉन्ट्रॅक्टर), समृध्दी महामार्ग प्रशासन यांचे प्रायोजकत्व व सहकार्याने ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पुर्ण झाली आहे.
 या स्पर्धेकरिता जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले त्या सर्वांचे मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या