Advertisement

Responsive Advertisement

बामणी येथील अपघातात निराधार झालेल्या कुटुंबाला आमदार जवळगावकर यांच्या सह दानशूर व्यक्ती सरसावलेहदगाव (ता. प्र.विकास राठोड ) हदगाव तालुक्यातील मौजे बामणी येथील रोजमजुरी करुन उदरनिर्वाह चालवणारे  टोपलेवाड कुटुंब सतरा जुलै रोजी  मोटारसायकल वरून हदगाव कडे जात असताना बरडशेवाळा बायपास वर टेम्पो च्या धडकेत  तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने या दुदैवी घटनेत दोन कुटुंब निराधार झाले.आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बामणी येथे टोपलेवाड कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केले.सांत्वन भेटीत परीस्थिती लक्षात घेऊन  दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये मदत दिली .कुडाणाचे साधे घर असल्याने गरज लक्षात घेऊन गरजेनुसार तात्काळ घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला. यावेळी मनाठा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवंशी,अनील पवार करमोडीकर, बामणीचे संरपंच बालाजी वायकुळे, उपसरपंच अक्षय पवार, शामराव पाटील अनिल आनेराव, पाटील, सोनाळे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तर परीस्थिती लक्षात घेऊन  बामणी फाटा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चव्हाण पाटील, व्यापारी प्रशांत हानवते बामणीचे उपसरपंच अक्षय पवार यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत  अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले. आरोग्यासह अनेक दाते सरसावत त्यांनी गरजेनुसार विविध जबाबदाऱ्या घेतल्या. 
   टेम्पो धडक देऊन पसार झाला असल्याने शोधण्यासाठी काहीही धागा नसताना दोन कुटुंबाची परीस्थिती लक्षात घेऊन मनाठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चिट्टेवार यांनी पसार झालेला टेम्पो  अथक परिश्रम घेऊन अखेर औसा येथे आठ दिवसांनंतर पकडला असल्याने अपघाती मदतीसाठी सोयीचे होणार असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्याचे कार्यक्षेत्रात कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या