Advertisement

Responsive Advertisement

एचपीटी आर्टस् आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या वतीने'अभिरुप संसद सादर


नाशिक - शतकपूर्ती महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने 'अभिरूप संसद'  हा कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला.अभिरूप संसदेत  संसदीय शासन पद्धतीनुसार भारतीय संविधानाच्या चौकटीस बांधील राहून काल्पनिक आणि नाट्यपूर्णरीत्या विधेयक तयार करून त्यात अभ्यास पूर्ण चर्चा केली गेली. यावेळी चार महिने सखोल अभ्यास करून अभिरूप संसद उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी  लोकसंख्या नियंत्रण व नियमनाशी संबंधित 'लोकसंख्या नियमन कायदा  लोकसंख्या नियमन कायदा आणि जनसंख्या अवरोधक  ( प्रजा ) २०२२' हे विधेयक तयार केले. जनसंख्या ह्या विषयाशी निगडित सहा संसदीय समित्यांचे गठन केले गेले तसेच सर्व समिती सदस्यांनी आपापल्या उप विषयाचा सखोल अभ्यास करून विधेयकाचा मसुदा तयार केला. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच लोकसंख्येच्या गुणवत्तेचा विकास, आर्थिक, सामाजिक विषमतेचे निराकरण, धार्मिक, लैंगिक व सामाजिक सर्वसमावेशकता वाढीवर भर पर्यावरणीय विकास आणि लोकसंख्येचे स्थिरीकरण होण्यासंदर्भातील तरतुदी ह्या सादर विद्यार्थ्यांमध्ये सादर केल्या गेल्या. अभिरूप संसदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा बहुभाषांचा प्रयोग सादरीकरणात केला. संसदेप्रमाणेच सत्ताधारी आणि विरोधी गट, अध्यक्ष, गृहमंत्री, पंतप्रधान, संसदीय सदस्य आदी घटकांचा समावेश ह्या अभिरूप संसदेत होता. ह्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, अभ्यास वृत्ती, राजकीय वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन चर्चा करण्याचे कौशल्य निर्माण होण्याचाही प्राथमिक हेतू होता जो आपल्याला अभिरूप संसद सादर होताना प्रत्यक्ष पाहायला मिळाला.  अभिरूप संसदेत श्वेता पाटील - प्रधानमंत्री, विवेक सोनवणे - गृहमंत्री, श्लोक सानप - लोकसभा अध्यक्ष, प्रशांत शिखरे - विरोधी पक्षनेता तसेच यज्ञेश मांडे, कार्तिकी बर्डे, शिखा विश्वकर्मा, अजिंक्य जगदाळे, सुमेध उबाळे, जय नाईक, अपूर्वा चौधरी, श्रीधर जोशी, धनश्री चव्हाण, श्रेया कुलकर्णी, शामल भोर, धनश्री चव्हाण,  दीपिका माळोदे, वैष्णवी गायकवाड, रेणुका श्रीमानवर, आकांशा डोरले, तिषा पाठक, प्रतीक दौडे, राजेश्वरी पाटील,  उमैमा बागवाला, समृध्दी पाटील, दिया माळोदे, अमेय आचार्य, अक्षदा देवरे आदींनी अभिरूप संसदेत मंत्री आणि खासदारांच्या भूमिका बजावल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या अभिरूप संसद सादरीकरणाचे कौतुक करत सांगितले की, विद्यार्थ्यांनी डेटाबेस सकट विधेयक मांडले ज्यातून शिकायला तर मिळाले विद्यार्थ्यांनाही कळले असेल की संसदेचे कामकाज कसे चालते, त्याची प्रक्रिया काय असते. संसदेचे कामकाज अवघड असते. कुठलेही बिल पास करणे इतके सोपे नाही. त्यातून अभ्यास मांडला जातो. अभिरूप संसद हा एक त्याचाच पाया आहे, असेही डॉ. पवार ह्यावेळी म्हणाल्या. त्यांनी युवा शक्तीची ताकद होत, युवकांनी राष्ट्रासाठी काम करा असेही संबोधले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी सर ह्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी देताना प्रतिपादन केले की, बोलावे कसे, अभ्यासपूर्णरित्या मांडावे कसे याचे उत्तम उदाहरण अभिरूप संसदेतील सहभागी विद्यार्थ्यांनी प्रस्थापित केले. हा दिवस महाविद्यालयाच्या इतिहासात आवर्जून नोंदवावा असा दिवस आहे असेही त्यांनी नमूद केले. ह्यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी,  बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. आनंद खलाणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, प्रा. गणेश गिरी, प्रा.अहिरे सर, प्रा. वसावे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभिरूप संसद कार्यक्रमासाठी प्रा. हरेश खैरनार यांनी महाविद्यालय समन्वयक तर विवेक सोनवणे यांनी विद्यार्थी समन्वयक असे दायित्व पार पाडले.
सदर कार्यक्रमाला विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच शहरातील अभ्यासू प्रेक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या