Advertisement

Responsive Advertisement

शिशु व माता सशक्तीकरणातून देश सक्षमीकरणाचे आमदार साहेबांचे ध्येय - पूनम पवार


धर्माबाद-नवजात शिशु व माता सशक्तीकरणातून  देश सक्षमीकरणाचेच आमदार राजेश पवार यांचे ध्येय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनमताई पवार यांनी धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत असलेल्या मोजे बाळापुर येथील विठ्ठलेश्वर मंदिरात शेकडो मातांच्या समोर केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृत्व वंदन योजना देशपातळीवर चालू केली. नवजात मातांना या योजनेद्वारे पाच हजाराची मदत शासनातर्फे केली जाते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यास सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३० मे २०२१ पासून नायगाव विधानसभा मतदारसंघात मा जिजाऊ मातृत्व वंदन अभियान हे वैयक्तिकरित्या चालू केले. या अभियाना अंतर्गत नवजात शिशु ती मुलगी असो अथवा मुलगा असो त्यांना ड्रेस, मातांना साडी चोळी, एक महिन्यांचे माता व बालकास आरोग्य सक्षमीकरणासाठी औषधी, व पौष्टिक ड्रायफ्रूट्स आदी जवळपास दोन ते अडीच हजार रुपयाची किट ही घरी विविध कामासाठी वापरात येणाऱ्या दुरडी मध्ये सुंदर पॅकिंग करून ते मातांना वाटण्यात येते.
नायगाव विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत सहा हजार किटचे वाटप करण्यात आले असून ही योजना ते आमदार असेपर्यंत राबवणार असल्याची माहिती पुनम ताई यांनी देत धर्माबाद नगरपालिकेसाठी तब्बल पाच कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी खेचून आणला, त्यामुळे शहराचा नक्कीच चेहरा मोहरा बदलणार असून शहराच्या इतर विकास कामाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी  कृती आराखडा तयार करून ठेवल्याचे त्यांनी सांगत धर्माबाद शहरासाठी स्वतंत्र ड्रेनेज व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना  हे पण त्यांचे स्वप्न असल्याचे म्हटले व त्यासाठी शासनाच्या वतीने शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करून घेण्यात येईल !
उपरोक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या माजी कृतिशील अध्यक्षा सौ. मीनाताई नलवार या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक, बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश अण्णा गौड, भाजपाचे नगरसेवक प्रतिनिधी अशोक पाटील बाळापुरकर, नगरसेवक संजय पवार, बाबू पाटील नरवाडे, नागनाथ जिंकले, यल्लप्पा स्वामी, सज्जन गड्डोड, गिरीधर बुंदेले, अर्जुन एनगंटीवार सनी लखमावार, पवन संगेवार, रोहित सुरकुटवार, शंकर रासगिनवार, अरविंद मोटकुल, यांच्यासह पत्रकार गंगाधर धडेकर, महेश जोशी, गंगाप्रसाद सोनकांबळे, राजेश सोनकांबळे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मोटकुल यांनी केले. तर हा कार्यक्रम आयोजित करून तो यशस्वी करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष चैतन्य घाटे, सतीश मोटकुल व भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले यावेळी दीडशे मातांना किट वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या