Advertisement

Responsive Advertisement

शिंदे सरकारने ग्रंथालयाचा उन्नतीसाठी योग्य निर्णय घ्यावेत..

सोयगाव/विजय पगारे
------------
महाराष्ट्र शासन व राज्य ग्रंथालय संचालनाकडून शासन मान्यता प्राप्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय यांची संख्या बरीच मोठी आहे,
   गाव तेथे ग्रंथालय शासनाच्या धोरणानुसार अगदी खेड्यापाड्या ते ग्रंथालय उघडली गेली आहे. गेल्या काही वर्षापासून नवीन ग्रंथालयाला मान्यता दर्जा बदलास मंजुरी देणे शासनाकडून बंद झाल्याने ग्रंथालयाची संख्या मर्यादित राहिली आहे.
       गेल्या काही वर्षात या त्या पक्षाचे सरकार आलेत काही बदल झाला पण कित्येक वर्षापासून ग्रंथालयाला मिळणाऱ्या अनुदान यात मात्र अजूनही बदल झालेला नाही. त्यातच दरवर्षी घ्यावी लागणारी ग्रंथसंपदा ,नियतकालिका वर्तमानपत्रे यांच्या किंमतीमध्ये झालेली मोठी वाढ इमारत भाडे, वीज फर्निचर खरेदी दुरुस्ती, स्टेशनरी ,सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथ बांधणी ,प्रवास ,जंतुनाशके व इतर बाबीवर होणारा खर्च प्राप्त होणारे अनुदान यांचा मेळ बसत नसल्यामुळे जमाखर्चाचा ताळमेळ बसवताना ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाला मोठी कसरत करावी लागते.
    शिवाय मिळणारे तुटपुंजे अनुदानही नियमित मिळत नसल्याने ग्रंथालयाचा खर्च उधार उसनेवार भागवावा लागतो हे वेगळेच ,आता पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये ग्रंथालया विषयक उत्तम जाण व आस्था असणारे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच सरकार महीनाभरापुर्वी आल्याने ग्रंथालय कर्मचार्‍यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.


------
महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय-पळसखेडा, विवेक वचनालय गोंदेगाव, स्व.दादासाहेब रतनसिंग सोळंकी-वरठाण, हुतात्मा राजहंस वाचनालय-जरंडी, ज्ञानदिप सार्वजनिक वाचनालय-फर्दापूर, छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय-निभोरा, नारायण बाबा सार्वजनिक वाचनालय-किन्ही, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय-गलवाडा, श्री साईबाबा सार्वजनिक वाचनालय सावळदबारा, माता तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालय-सोयगाव आदी वाचनालय सोयगाव तालुक्यात असुन शासनाचा तटपुंचे अर्थसहाय्याने चालक हतबल झाले आहेत. शिंदे सरकारने ग्रंथालय आणि वाचनालयास भरीव निधी  उपलब्ध करून द्यावा.

%   उत्तमराव थोरात 
महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय-पळसखेडा ता.सोयगाव जि.औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या