Advertisement

Responsive Advertisement

घोसल्यात येथे पीक संरक्षण सप्ताह उत्साहात...

सोयगाव/विजय पगारे
----------------------------
 घोसला ता. सोयगाव येथे सरपंच गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली पीक संरक्षण सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले,
          या कार्यक्रमात कृषी सहाय्यक संभाजी पाटील यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रणा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोबत कृषी सहाय्यक प्रवीण वाघ यांनी कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी व कामगंध सापळे याबाबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हेमंत देशमुख यांनी पीक विम्याचा बीड पॅटर्न व ई पीक पाहणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सोबत  व्ही. एस. निकुंभ यांनी रस शोषण करणारे किडी याबाबत माहिती दिली सोबत आत्मा तालुका तंत्रज्ञान प्रमुख अमोल महाजन यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली,  पीक संरक्षण मोहीम तालुका कृषी अधिकारी संपत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे. एकात्मिक अन्न द्रव्ये व्यवस्थापण आणि कीड रोग व्यवस्था  या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
               सदर कार्यक्रमाला गावातील प्रगतिशील शेतकरी वर्ग व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या