Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव तालुक्यातील परिसरात खुरपणीसाठी मजूर मिळेना शेतकरी हैराण ,रिपरिप पाऊस थांबल्याने शेती कामांना आला वेगसोयगाव -(विजय पगारे)
 

सोयगावसह तालुक्यातील बनोटी ,गोंदेगाव , सावळदबारा चारही मंडळात  चक्क एक आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेत शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने शेती कामांना चांगलाच वेग आल्याचे चित्र सर्वत्र सोयगाव तालुक्यात गोंदेगाव,हनुमंतखेडा,किन्ही,बनोटी,तिडका,घोसला,बहुलखेडा, फर्दापूर,जामठी, जरंडी,सावळदबारा परिसरातील अठरा गावात
 पाहावयास मिळत आहे. मात्र खुरपणीसाठी वेळेवर मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांची विनवणी करावी लागत आहे. कापूस मका तोडणी,खुरपणी, कोळपणी असे शेतकऱ्यांचे सर्व कामे एकत्र आल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.सोयगाव तालुक्यात मागील दिवसात काही आठवडे उलटूनही गेले तरी पावसाची रिपरिप सुरूच होती.परंतु आता सात ते आठ दिवस झाले आहे की, वरुणराजे आता सध्या तरी सुट्टीवर असल्याने कामाला वेग आला आहे.मागील दिवसांत  सततच्या पाऊसाने सुरू होता त्यामुळे शेतात तणाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली  आहे.आता पावसाने उघडझिप दिल्याने शेती कामांना वेग आला असून खुरपणी, कोळपणी, औषध फवारणी आदी कामे जोमाने सुरू असल्याचे चित्र सर्वत्र परिसरात पाहावयास मिळत आहे.यामध्ये कपाशी, सोयाबीन, मक्का, उडीद, मुंग, भुईमूग, तुर, कांदा, मिरची ह्या पिकांतील वाढलेले तन काढत आहेत तसेच
बैल औताने (कोळपणी) करण्याचे काम जोमात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. तर कीटक नाशक औषधी फवारणीचे कामे सुरु आहेत.
----------------------------------
बाॅक्स
---------

मागील आठवड्यापुर्वी मंडळनिहाय्य प्रजन्यमान सोयगाव - ४२१ मी.मी.,सावळदबारा - ४१४ मी.मी.,बनोटी - ४०४ जरंडी - ४०१ मी.मी. सोयगाव तालुक्यात एकुण = ४१० सरासरी मी.मी.पावसाची नोंद महसुल कडून घेण्यात आली आहे.*चांगल्या रोजगारामुळे  परिसरातील कापूस निंदनीय मजूर*

""सोयगाव सह कंकराळा माळेगाव , कवली , वरसाडा,उमरविहीरे, परिसर परिसरात कापूस लागवड   तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली असुन, कापूस निंदनीय मजुर मिळतात पण शेतातील तण काढण्यासाठी व खुरपणी साठी मजूर येत नाही.
कारण निंदनीय पासुन मजुराला चांगला रोजगार मिळत असल्याने मजुर  जात असल्याचे चित्र सद्या पाहावयास मिळत आहे. अनेक शेतकरी जास्तीची मजूरी देऊन शेतातील खूरपणी,तणनाशक, कोळपणी करून घेत आहे.
   
शेतकरी
भागवत थोटे (पाटील)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या