Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव आगळावेगळा अन्नादान करून साजरा..

* जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे गोपाळ पंगत उत्साहात...!

सोयगाव/विजय पगारे
-------------
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त आदर्श शाळा जिल्हा परीषद  प्राथमिक  शाळा रामजीनगर - सोयगाव येथे शनिवारी (ता.१३)  सकाळी कै.बाबुरावजी काळेनगर परीसरात प्रभात फेरी काढून शाळेची नेहमीत साफ - स्वच्छता ठेवणारे संजय कोळी यांना शालेय व्यवस्थापनाने मान देत त्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दुसऱ्या सञात बालगोपाल विद्यार्थ्यांसाठी  गोपाल पंगतीचे आयोजन करण्यात आले यात तिन वेगवेगळ्या उत्तम प्रतीच्या तांदळाचा विविध रंगात भात शिजवून करण्यात आला.या तिन्ही भातांना राष्ट्रध्वजचा आकर्षक रंग देण्यात आला आकर्षण असलेला भात शालेय बाल विद्यार्थ्यांना भोजनात देण्यात आला.
दरम्यान सोयगाव शहराच्या नगर पंचायत नगराध्यक्षा आशाबी तडवी,माजी पंचायत समिती सदस्या दैपदाबाई सोनवणे,सोयगांव केंद्र प्रमुख  फिरोज तडवी,एकनाथ इंगळे, विठ्ठल इंगळे, दत्तात्रय जोहरे,राजेंद्र इंगळे,मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सहशिक्षक  यांनी सुध्दा विद्यार्थांसोबतच  गोपाळ पंगतींचा आनंद लुटत अस्वाद घेतला. या गोपाळ पंगत उपक्रमाचे पालक - ग्रामस्थांनी मनभरुन कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या