Advertisement

Responsive Advertisement

अंजता व्हॅली इंग्लिश स्कूल मध्ये विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमांची रेल तेल ...सोयगाव/विजय पगारे


 देशभरात शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या ७५ वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे याच अवचित्याने  "हर घर तिरंगा " "आझादिका अमृत महोत्सव" निमित्त सोयगाव येथील अजंता व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असुन १३ ते १५ सलग तीन दिवस कार्यालयांची रेल-चेल राहनार असल्याची शालेय व्यवस्थापनाकडून मिळाली आहे
         ता. १३ ऑगस्ट  शनिवारी स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करतांना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देनाऱ्यां महान थोर महात्मा गांधी ,परम पूज्य डाॅ.बाबासाहे आंबेडकर जिवनावर आधारीत संस्थेतील बालविद्यार्थींनी भाषण दिली.
दरम्यान  शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभुषा परिधान केलेला दिसुन आले, यापुर्वीच गेल्या दोन दिवस अगोदर ढोल ताशांच्या गजरात शालेय व्यवस्थापनाने व विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून जनतेला देश प्रेमा चा संदेश दिला. ता. ९ ऑगस्ट २०२२ मंगळवारी रोजी शाळेत क्रांती दीन साजरा करण्यात आला. आणि पंचायत समिती सोयगाव येथे शाळेतील सर्व विध्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक राष्ट्रीय गान मध्ये उत्साहात सहभाग नोंदविला. शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .. तिरंगा रांगोळी स्पर्धा, देश भक्ति गीत स्पर्धा, देशभक्ती पर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा , चित्र स्पर्धा, विविध पोस्टर  भारतीय झेंडा प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे संचालक  बी. एन. पिंगाळकर ,  डॉ. दिनकर पिंगाळकर, सौ. डॉ. स्वाती पिंगाळकर, शाळेतील प्रिन्सिपॉल सौ. वैशाली सतीश बोडखे व शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्साहात सहभाग नोंदविला. तर रक्षाबंधन  निमित्त शाळेत   मुलींनी शाळेतील मुलांना राखी बांधून आपण सर्व भारतीय आहोत आणि  सर्व भारतीय भाऊ बहीण आहोत हा संदेश दिला पुढेही कार्यक्रमांची भरगच्च रेलचेल राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या