Advertisement

Responsive Advertisement

धर्माबादच्या आयटीआय जवळ आढळले भारतीय प्रजातीचे अजगर...

        धर्माबाद:-शहरातील धर्माबाद ते बासर कडे जाणाऱ्या  रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जवळपास मुख्य रस्त्यावर भारतीय अजगर आढळून आले असून त्यास सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे.
        सध्या शहरातील आंध्र बसस्टँड हून आयटीआय मार्गे तेलंगणा सीमेशी संलग्नित होणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक गाड्या येथे आहेत त्यातील एक नव्या पद्धतीचे रुळ रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले होते. या रुळाच्या चाकामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या भारतीय प्रजातीच्या अजगराने स्थान केले. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी तेथे जाऊन अजगरास सुरक्षितपणे पकडले. मात्र यावेळी पाहणाऱ्यांची चांगलीच गर्दी झाल्याची पाहायला मिळाली होती.


      सदरील अजगर हे भारतीय अजगर म्हणून ओळखल्या जाते. ते बिनविषारी असते व लहान प्राण्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत म्हणजे ससा,हरीण,रानडुक्कर आदींवर ते आक्रमण करते. तर आज आढळलेल्या अजगराची लांबी साधारणतः ६ फूट आहे.
            - क्रांती बुध्देवार सर्पमित्र, धर्माबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या