Advertisement

Responsive Advertisement

पूर्वी सुरू असलेल्या सर्व बसेस पुर्ववत सुरु करण्यासाठी न.प.नगरसेवक चे संतप्त होत दिले निवेदन...

सोयगाव/विजय पगारे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पूर्वी सुरू असलेल्या सोयगाव-अकोला , सोयगाव ते पिशोरसह अनेक बस औरंगाबाद विभागाच्या सोयगाव बस आगाराने बंद केल्या आहेत, अनेक सन पुढे येत नसल्याने बस सेवे अभावी अव्वा च्या सव्वा अधिक जादा भाडे देवून नाईलाजाने अधिकचा भुर्दंड सहन करत प्रवास करावा लागत आहे. वरिष्ठांकडून मंजुर असलेल्या त्या बंद केलेल्या बसेस सुरू करण्याची मागणी सोयगाव नगर पंचायत च्या नगरसेवीका कुसुम राजू दुतोंडे, रामदास घनगाव,अमोल मापारी, राजेंद्र दुतोंडे यांनी सोयगाव आगार प्रमुखाकडे गुरुवारी (ता.२५) केली.

" शुक्रवारी ता.२६ ला  झाला आत्ता पोळा " सन झाले गोळा " हरतालिका तृतीया,श्रीगणेश चतुर्थी,अनंत चतुर्दशी,भाद्रपद पोर्णिमा, संकट चतुर्दशी, ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती, भाद्रपद अमावास्या - सर्वपित्री दर्श आमावाशा, घटस्थापना, विनायक चतुर्थी, विजयादशमी - दसरा, कोजागिरी पोर्णिमा, - ईद ए मिलाद, संकट चतुर्थी, तर नोव्हेंबर महिन्यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा, भाऊबीज, गुरुनानक जयंती, अंगारक संकष्ट चतुर्थी सनांची पर्वनीच येणार आहे.या पुढील काळात प्रवाश्यांची मोठी रेलचेल राहणार आहे. राज्य महामंडळाला कोरोना महामारीमुळे, व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन व मोठी आर्थिक हाणी झालेली आहे. झालेला तोटा भरुन काढण्यासाठी जनू ही संधीच आहे. बंद असलेल्या सर्व बस सेवा नविन लांब पल्ल्याच्या सेवा सोयगाव आगाराने सुरु करुन ग्रामीण भागातीत जनसामान्यांची धमिनी म्हणुन उदयास आलेली, बहुजन हिताय...!बहुजन सुखाय... ब्रिद उराशी बाळगून असलेली बस सेवा द्यावी, ग्रामीणभागाची नाळ शहराला जोडण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून सोयगाव बस आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांना विनंती निवेदन देण्यात आल्याचे नगरसेविका कुसुम दुतोंडे यांनी आमच्या प्रतिनिधीला वार्तालाप करतांना सांगितले.
-----------------------------------
बाॅक्स :
---------
औरंगाबाद विभागाच्या सोयगाव बस आगारात ३९ बसेस असुन, बस चालक ७६ , वाहक २९ संकेत मोठी तफावत आहे.जिल्हा व्यवस्थापक व विभागीय कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या भरुन काढण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे.सद्यातरी इच्छुक वाहकाकडून ओव्हर टाईम करुन बस चे नियतन चालवत आहोत.सर्व नियतने चालवण्यासाठी कर्मचारी संख्या वाढल्यास मंजुर व बंद नियते,लांब पल्ल्याची नियते मागणीचा विचार करुन नवीन प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करु

रा.प.म. औरंगाबाद विभागाचे
सोयगाव आगार प्रमुख
हिरालाल ठाकरे 

---------
बाॅक्स : 
---------
आगारात ३९ बसेस पैकी १ मालवाहूट्रक, ६ जगप्रसिद्ध अजिंठा लेणी,२ पुणे,दोन कल्याण,१० गणपती सिझन मुंबई साठी लेल्या ,तर २० बसेस सोयगाव तालुक्यातील ७६ गावांच्या प्रवासासाठी शिल्लक राहतात त्या अपुऱ्या पडतात, ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला औरंगाबाद विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून सचिन क्षिरसागर यांनी सुत्र हाती घेतली पुर्वी त्यांनीं हदगाव,देगलुर येथे डेपो मॅनेजर तर पदोन्नती होवून नांदेड,अकोला विभागीय वाहतुक नियंत्रक म्हणून काम पाहिलेले आहे.मुळचे नांदेडचे रहिवासी असल्याने ग्रामीण भागातील प्रवास्यांच्या अडचणी जाणून असल्याने त्यांनी सोयगाव आगारातील रिक्त कर्मचारी भरुन काढावे ब्रिद प्रमाणे खऱ्या अर्थानं बहुजन सुखाय...! बहुजन हिताय...! सेवा द्यावी.

प्रवाशी 
पुनमसिंग परदेशी

-------
बाॅक्स : 
--------- 
सोयगाव तालुक्यातील ७६ गावातील प्रवाश्यांना प्रवासाची सोय व्हावी म्हणुन २८ ते ३० वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहन मंत्री बाबुराव काळे यांच्या प्रयत्नातून रा.प.मडळाचे प्रशस्त बस आगार,डेपो मॅनेजरसाठी निवास स्थान दिलेले आहे. शुक्रवारी ( ता.२६ ) आगारातून १० बसेस गणपती सिझन साठी मुंबई रवाना झाल्या , यावेळी डेपो मॅनेजर हिरालाल ठाकरे अनुपस्थित होते, मुख्यालयी न राहता मुळ गाव बोदवड जिल्हा जळगाव येथुनच आपल्या पदाचा कार्यभार हाकत होते " उंटावरुन शेळ्या हाकत " असल्याने डेपोत कैलास बागुल, राहुल ठाकुर वाहतुक नियंत्रक हेच सर्व कार्यालयीन काम करीत होते.

सोयगाव शहरातील प्रवाशी संघटना प्रमुख
भगवान पंडीतटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या