Advertisement

Responsive Advertisement

संभाजी ब्रिगेड संघटना रायगड जिल्हाध्यक्ष पदी शिवश्री विक्रम विजय वाठोरे यांची निवड

        बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हाच्या माणगाव तालुक्यातील  हरहुन्नरी व्यक्तीमहत्त्व तसेच उतम समाज प्रबोधन करणारे आणि समाजातील अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध बंड करणारे शिवश्री विक्रम विजय वाठोरे यांच्या सामाजिक, व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांची संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
       शिवश्री विक्रम विजय वाठोरे गेली सहा वर्ष पासून शिवश्री भूषण राजाराम सिसोदे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनेत रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पदावर क्रियाशील राहून  त्यांनी अनेक आंदोलन व सामाज उपयोगी कामे केली आहेत. शिवश्री विक्रम विजय वाठोरे यांच्या नेतृत्वाने रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहात चालू करण्यात आला. 
          असे अनेक सामाजिक कार्यक्रम व महापुरुषांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, शाक्त शिवराज्याभिषेक  समिती,राजमाता जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा या सर्व समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल दखल घेऊन ऍड. मनोज दादा आखरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या अध्यक्षतेखाली शिवश्री विक्रम विजय वाठोरे यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.
       त्यामुळे त्यांचे समाजातील सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यां कडून व समाजातील सर्व स्तरातून तसेच सोशल मीडियाच्या वॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमातून त्यांचे स्वागत होत अाहे. त्यामुळे त्यांचे सर्व नातेवाईक आणि मित्र परिवार तसेच त्यांच्या हितचिंतक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या