Advertisement

Responsive Advertisement

तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने पोळा सन साजरा...
प्रतिनिधी. शांताराम मगर 


वैजापुर तालुक्यातील तलवाडा (नागवाडी) येथे ड्राॅ पद्धतीने पोळा साजर करण्यात आला बर्याचदा पोळा सनाच्या मान पानावरुन वाद होतात.पोळयाचा मान हा प्रत्येक शेतकर्याला मिळावा या हेतूने प्रतेक शेतकर्याच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या यावेळी लहान मुलाच्या हस्ते काडुन बाबासाहेब तातेराव मगर या शेतकर्याच्या नावाची चिठ्ठि निघाली त्या शेतकर्याच्या बैलांना वेसन मोहरी माठुकी कासरा देऊन शेतकर्याचा साल श्रीफळ देऊन शेतकर्याचा सत्कार करण्यात आला व त्या शेतकर्याला पोटळ्याचा मान दिला.यानंतर ज्या शेतकर्याला मान मिळाला आशा शेतकर्याच्या नावाची चिठ्ठी पुढील वर्षी काढली जानार नाही जेणेकरुन प्रत्येक शेतकर्राला मान मिळेल आसे कु ऊ बा समितीचे सभापती भागीनाथ मगर यांनी सांगितले तर आशा ड्राॅ पध्दतीने पोळा साजरा झाल्यामुळे गावातील प्रतेकाला मान मिळेल अशा पद्धतीने सन साजरे केल्यास सामाजिक सलोखा साखण्यास मदत होते. यावेळी मारोती मंदिरात नारळ फोडुन भरपूर पाऊस पडुदे ईडा पिडा टळुदे बळीच राज्य येऊदे आसे मारोती रायाला साकडे घातले. 

शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो.बैल पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करातो पोळ्यात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. शेतीप्रधान या देशात, व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटुक्या गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात करदोड्याचे तोडे,आसा श्रुंगार चडवुन बैलांना खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. गावाच्या मारोती मंदिराला एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणून पोळा 'फुटला यावेळी कु.ऊ.बा. सभापती भागिनाथ मगर चेअरमन राजेन्द्र मगर
 शिवाजी मगर शाउलाल मगर विठ्ठल मगर अरुण जाधव मनोहर मगर शामराव मगर आबासाहेब मगर काशिनाथ मगर आशोक मगर भानुदास जाधव लक्ष्मण मगर यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते 
यावेळी शेतकर्यानी कडा पाडा टळुदे बळी राज्य येऊ दे
मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे आसे साकडे मारुतीला घातले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या