Advertisement

Responsive Advertisement

हर घर तिरंगा ,घरावरील तिरंग्याची जबाबदारी कोण घेणार ? -बी .एस. एफ. माजी सैनिक संजय जाधव यांचा प्रश्न ...?

सोयगाव / विजय पगारे
----------------------
भारतीय स्वातंत्र्यला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष पुर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत " हर घर तिरंगा " हे मिशन भाजपा सरकारने हाती घेतले असून, इ.स.१९४७ मध्ये आपल्या भारत देशाला इंग्रजांकडून  स्वतंत्र झाला. भारताचा ध्वज तिरंगा या तिरंग्या ध्वजासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं अनेकांनी रक्त सांडलं. तिरंगा आपली " आनं "  " बान " " शान " अस्मिता आहे.
परंतु भाजपातील केंद्र सरकारने ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा ठरवलं आहे.काहींना घरावर तिरंगा लावण्यासाठी घर नाही, ज्यांना घर आहेत अशांना तिरंगा लावून आपण जोखीम पत्करावी की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे.? सध्या पावसाळ्याचे दिवस ही आहेत घरावर लावलेल्या तिरंग्यावर जर मुसळधार पाऊस आला जोरदार वादळाने तिरंगा उडून गेला ? तर कोणावर कारवाई करणार ? कोण जबाबदार राहणार असा प्रश्न बी.एस.एफ.माजी सैनिक संजय जाधव देव्हारी ता.सोयगाव जिल्हा औरंगाबाद यांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय ?
देशातील अनेक राज्यांत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी ७५ वर्ष होवूनही पोहचली नसल्याची खंत ही व्यक्त केले. अनेक भागात सकाळ व संध्याकाळ दोन वेळ पोटभर अन्न मिळत नाही. विविध जाती, धर्माचा आपला देश आहे. देशात विविध राज्यांमध्ये विविध पोशाख , विविध भाषा देखील पहायला मिळते. देशातील तरुणांसाठी रोजगाराची संधी,ग्रासित भागातील प्रतेक गावखेडे रस्त्याचे मजबुती करून तालुका - जिल्हाला - शहराला जोडण्याची गरज असतांनाच या देशात देवी देवतांच्या मूर्तींना दुध-तेल चढावा चढवल्या जातो,राजकिय पक्षांचे आमदार-खासदार थाळा वाजवण्यासाठी प्रोसाहीत करतात. ७५ व्या स्वातंत्र्य मोहोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा मिशन मध्ये या तिरंग्याची जबाबदारी सरकार घेणार आहे का ? माजी सेविका जाधव प्रश्न यांनी विचारला आहे. देशातील तळागाळातील सर्व सामान्यांना प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा ध्वज माहिती असावा त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे का. ?
शिवाय ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत लोक कामा धंद्यात व्यस्त आहेत लोक शेतात कामाला जातील की घरावर असलेला तिरंगा वर नजर ठेवत राहतील
त्यामुळे ही सर्व जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी सुद्धा माजी सैनिक संजय जाधव त्यांनी केली आहे ?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या