Advertisement

Responsive Advertisement

शिऊर गाव स्वामीमय ,स्वामींच्या जयघोषात न्हाऊन निघाले शिऊर


शिऊर : 
टाळ -मृदुंगाचा जयघोष, लेझीम पथकाचे देखणे सादरीकरण, वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केलेले बालक, टाळाच्या ठेक्यावर ताल धरणारा अश्व, घरोघरी उभारलेल्या गुढ्या, प्रदक्षिणा मार्गावर रांगोळीची आरास,  डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजनात तल्लीन झालेल्या महिला, मंगलवाद्याचा मंगल सूर,   या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात श्री संत शंकरस्वामींचा जयघोष... हे सर्व डोळ्याचे पारणे फेडणारे चित्र होते वैजापूर तालुक्यातील शिऊर या गावचे . 
श्री संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संत निळोबाराय व संत निळोबारायांचे शिष्य श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला २७६ वर्षाची अखंड परंपरा लाभली असून यावर्षीचा २७७ वा अखंड हरिनाम सप्ताह संतभूमी  शिऊर येथे भक्तीभावात संपन्न होत आहे .मंगळवार दि २  पासून या सप्ताहास कलशपूजनाने प्रारंभ झाला  असून  श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या रथाची शिऊर  गावातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते.  डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांवर्ग देखील भक्तीनामात तल्लीन झाल्या होत्या तर स्थानिक लोकप्रतिनिधीनीही फुगडीवर ठेका धरला. डोक्यावर कलश घेऊन मराठमोळ्या पेहरावात विद्यार्थिनी या शोभायात्रेत सहभागी झाल्या. फटाक्यांची आतषबाजी करत या मिरवणुकीचा समारोप सप्ताह स्थळी झाला. दरम्यान या सप्ताह मध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. दिनांक ९ रोजी संस्थानचे उपाध्यक्ष  सारंगधर महाराज भोपळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल. 
*रांगोळीतुन रेखाटले श्री संत शंकरस्वामीं महाराज* 
फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधत खरज येथील लक्ष्मी व बालिशा कुंदे यांनी श्री संत शंकरस्वामी महाराजांची प्रतिमा हुबेहूब साकारली, तर प्रकाश घोडके  सप्ताहस्थळी या रांगोळीची चर्चा आहे. 
*डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई* 
श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरासह संपूर्ण बाजारतळ परिसरात करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली आहे, खंडोबा मंदिर ते संत बहिणाबाई महाराज मंदिरापर्यत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
*समाधीवर फुलांची आरास, सजावटीने प्रसन्न वातावरण* 
हा सप्ताह फिरता नारळी असतो, दरवर्षी पंचक्रोशीतील  गावात हा सप्ताह संपन्न होतो या वर्षी हा सप्ताह स्वामींची समाधीस्थान असलेल्या शिऊर क्षेत्रात होत असून या सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे , शिवाय  कॊरोनाच्या काळानंतर व्यापक प्रमाणात हा सप्ताह होत असल्याने भाविकांचा मोठा ओघ असणार आहे, स्वामींच्या समाधीला आकर्षक फुलांची आरास व सजावट करण्यात आली असून महाद्वाराला लावलेले तोरण भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. 
*भव्य कीर्तन मंडप* 
या सप्ताहाला विशेष आकर्षण भव्य कीर्तन मंडप ठरला आहे, तब्बल तेवीस हजार स्क्वेअर फूट जागेवर हा मंडप असून यात विविध रंगसंगतीने आकर्षक सजावट केली आहे तर भव्य व्यासपीठावरून ज्ञानदान होत आहे.

*किर्तन मंडपातुन एलएडी स्क्रीनच्या माध्यमातून सप्ताहाचे थेट प्रक्षेपण सुरु आहेत फेमस फोटो स्टुडिओचे शांताराम मगर यांनी ड्रोन कॅमेर्यात टिपलेले विहंगम दृश्य*====/
*लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थ सहभागी*
या सप्ताह प्रारंभ मिरवणूकित लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, 
यावेळी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, सचिव बबनराव जाधव, सप्ताह समितीचे उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे, सुभाषचंद्र जाधव, माजी सरपंच सीताराम राऊत, चंद्रशेखर खांडगौरे, अशोक जाधव, निलेश देशमुख,नितीन चुडीवाल, संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज पगार, सरपंच राजश्री जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळा जाधव, विश्वस्त मंडळाचे पोपटराव जाधव,  शिवाजी साळुंके, अनिल भोसले, मधुकर पवार, वाल्मिक भावसार, शिवाजी जाधव,  सुनील देशमुख, बाळू पवार, राजेंद्र वरपे, दिलीप जाधव, भाऊसाहेब हारदे, मच्छीन्द्र जाधव, मिनीनाथ जाधव, काशिनाथ जाधव, उमाकांत एकबोटे, हरिभाऊ घोडके, शिरीष चव्हाण, सुशील देशमुख, आसाराम जाधव, अण्णा सुर्यवंशी, योगेश शेळके, आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या